शाळा चांदोबा गुरुजींची
या वा-याच्या बसुनी विमानी
सहल करुया गगनाची
चला मुलांनो आज पाहूया
शाळा चांदोबा गुरूजींची
सहल करुया गगनाची
चला मुलांनो आज पाहूया
शाळा चांदोबा गुरूजींची
स्थळ: तारांगण शिक्षण संस्थेचे, आकाशगंगा ९१हायस्कूल
आज पौर्णिमा जमले तारे
आकाशाच्या वर्गात
चांदोबा गुरुजी तर दिसती
चांदोबा गुरुजी तर दिसती
कुठल्या मोठ्या मौजात
हसुनी चांदण्या करीती किलबील
हसुनी चांदण्या करीती किलबील
अपुल्या इवल्या डोळ्यांची
पण प्रत्यक्षात गुरुजी जरा चिंतेतच होते
आज चांदोबा गुरुजी नेहमी पेक्षा जरा जास्तच उशिरा आले. कारण ही तसेच होते म्हणा, मोबाईलवरचे ' *खंडग्रास चंद्रग्रहणाचे*' मेसेजेस डिलीट करण्यातच त्यांचा बरासचा वेळ गेला होता
गुरुजी ढगांचा दरवाजा लोटून वर्गात शिरताच

विद्यार्थी:- एक साथ नमस्ते🏼
गुरुजी,
बसा, बसा . .कसे आहात सगळे?
बसा, बसा . .कसे आहात सगळे?
अरे काय हे नागपंचमी होऊन गेली तरी अजूनही तुम्ही *काल स्पर्श योगातच* बसलाय?
चला बर या आपापल्या ठिकाणी.
चला बर या आपापल्या ठिकाणी.
*रवि - मंगळ* , तुम्ही आता *कर्क* बाकावर या.
सध्या दोघांची *युती* आहे. जास्त दंगा नकोय वर्गात तुमचा.
सध्या दोघांची *युती* आहे. जास्त दंगा नकोय वर्गात तुमचा.
आणी हो मंगळ , शनी पासून तू जरा लांबच रहा. एकवेळ रवी बरोबरची तुझी युती परवडली पण शनी बरोबर एका बाकावर किंवा अगदी सरळ रेषेत जरी आलास आले तरी किती हाहाकार उडवता तुम्ही कल्पना आहे ना?
आणखी एक लक्षात ठेव मंगळा, वर्गात पहिला, चवथा, सातवा, बाराव्या बाकावर जास्त वेळ तू बसायचं नाहीस कळलं? उगाच वर्गाला ' मंगळ' लागतो मग. हे ऐकून
आणखी एक लक्षात ठेव मंगळा, वर्गात पहिला, चवथा, सातवा, बाराव्या बाकावर जास्त वेळ तू बसायचं नाहीस कळलं? उगाच वर्गाला ' मंगळ' लागतो मग. हे ऐकून
*कुणी तेजाचे ओठ हलवूनी मंगळास वेडावित असे*
*रागाने मग मंगळ वेडा गोरामोरा होत असे*
*बघुनी सारे हसता हसता उडते चंगळ तार्यांची*
*रागाने मग मंगळ वेडा गोरामोरा होत असे*
*बघुनी सारे हसता हसता उडते चंगळ तार्यांची*
वर्गातील कळीचा नारद कुठाय? असे चांदोबा गुरुजी म्हणताच सर्वानी
' बुध' ग्रहाकडे बघितले. त्याने ही - हजर ' सिंह' रास बाक असे ओरडून सांगितले.
गुरुजींनी त्याला सांगितले एकटा असतोस तेंव्हा ठिक आहेस रे पण *राहू* बरोबर, *शनी*बरोबर, *वक्री*होऊन द्वितीय बाकावर आलास की कस त त प प करतोस, *दातखिळी बसते*तुझी. तेंव्हा काळजी घे.

*गुरु*कसा आहेस रे बाबा? असे म्हणताच वर्ग सेक्रेटरी गुरु खुलला. म्हणाला गुरुजी ' *कन्यागत पर्व*' संपून लवकरच आता मी *तुळ* राशीत जाईन. तिथेच बसून मी जे ग्रह कुंभ, मेष, मिथुन बाकावर बसतील त्याच्या कडे मी चांगल्या दृष्टीने पाहिन.
हरकत नाही हरकत नाही असे म्हणत गुरूजींनी आपला मोर्चा शुक्राकडे वळवला.
हरकत नाही हरकत नाही असे म्हणत गुरूजींनी आपला मोर्चा शुक्राकडे वळवला.
शुक्र हा तसा इतरांपेक्षा सुखवस्तू घरातून आलेला, बंगला, गाडी आणी इतर चैनीच्या वस्तूची कमतरता नसणारा असा समाधानी विद्यार्थी. अधूनमधून फाँरेनला ( दुस-या आकाशगंगेत) जाऊन आलेला वर्गातील गुरुजींचा लाडका विद्यार्थी. गुरुजींकडे तो *खाजगी शिकवणीला* ही जायचा त्यामुळे तो मर्जीतला होता
तरीही त्यालाही चांदोबा गुरूजींनी ' *कृतिका नक्षत्रात*' सातव्या बाकावर असताना काळजी घ्यावयास सांगितले.
तरीही त्यालाही चांदोबा गुरूजींनी ' *कृतिका नक्षत्रात*' सातव्या बाकावर असताना काळजी घ्यावयास सांगितले.
शनी बद्दल स्वत: गुरुजींना साडेसातीची भिती वाटत असल्याने ते फारसे त्याच्या नादाला लागत नसत*.
राहू, केतू चांदोबा गुरुजींच्या वर्गात कधीच उपस्थित रहात नसत.
राहू, केतू चांदोबा गुरुजींच्या वर्गात कधीच उपस्थित रहात नसत.
नंतर गुरूजींनी नक्षत्रांच्या बाकांकडे एक नजर टाकली. तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की *चित्रा, स्वाती,विशाखा, अनुराधा , जेष्ठा* या सगळ्याजणी गैरहजर आहेत. लगेच त्यांना माहिती देण्यात आली की रोहिणीने वृश्चिकेत मंगळागौरीला म्हणायच्या गाण्याचा/ खेळांचा एका दिवसाचा *विशेष अभ्यासक्रम* ठेवला आहे आणी म्हणून त्या आलेल्या नाहीत
द्वितीयेपासून रोजची येती गुरुजी उशीरा शाळेत
*मुले चांदणी फुलती आणिक सगळी अपुल्या गमतीत*
*कधी वर्गातून पळते उल्का ओढ लागुनी पृथ्वीची*
*मुले चांदणी फुलती आणिक सगळी अपुल्या गमतीत*
*कधी वर्गातून पळते उल्का ओढ लागुनी पृथ्वीची*
हजेरी झाल्यावर गुरुजी अभ्यासाकडे वळले. आज कुणी किती *गतीने धावायचे*, *शनी उलटा ( वक्री) किती धावेल*, आजचा *राहू काल*, होरा कोष्टक, तिथी, पळ, घटिका, नवमांश, *अष्टकवर्ग सारिणी*ई विषयाची उजळणी केली.
शेवटी गुरुजींनी मुलांना सांगितले येत्या *पोर्णीमेला* मी *मकर* रस्ताच्या २४ व्या गल्लीतून जाताना मला *केतू*कुंभ राशीच्या अडोशाने माझ्यावर *ग्रहण* घालणार आहेत तेंव्हा सोमवारी शाळेला *सुट्टी*
असे गुरूजींनी जाहीर करताच मुलांनी टाळ्या वाजवून या घोषणेचे स्वागत केल

*कधी वेळेवर केव्हा उशीरा, अवसेला तर पूर्ण रजा*
*राग कधी ना या गुरुजींना, कधी कुणा करीती ना सजा*
*असे मिळाया गुरुजी आम्हां करू प्रार्थना देवाची*
*राग कधी ना या गुरुजींना, कधी कुणा करीती ना सजा*
*असे मिळाया गुरुजी आम्हां करू प्रार्थना देवाची*
आणी शाळा संपून आजचा *तारांकित* दिवस कारणी लागला
No comments:
Post a Comment