सांग,ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू ?
✨✨⭐
तू काय सांगणार ? " आमचं ठरलंय " आधीच
राजकारणी झालास की
मान्य , नुकताच राजकारणात प्रसिद्ध झालेला हा शब्द " आमचं ठरलंय ". पण राजकारण म्हणजे सगळंच वाईट नसतं ना ? मग त्यातली चांगली संकल्पना घेतली तर बिघडलं कुठं ?
तर त्या कोजागिरीच्या चांदण्याच आणि आमचं असं ठरलय की या अश्विनी पोर्णीमेच्या शुभ्र प्रकाशात या वसुंधरेला जसं हे चादणं न्हाहू घालते तसेच या वसुंधरेच्या लेकरांच्या मनात ही लख्ख प्रकाश पाडायचा . मनातील क्लेश, द्वेष , राग या भावनांची जळमटं दूर करायची
हे ' आमचं' ठरलय' . नीट वाच . माझं नाही. कारण "आमचं" या शब्दात माझं या शब्दा पेक्षा जास्त शक्ती आहे.
हा पण तू म्हणतोय त्याला पुरावा ?
हे काय विचारणं झालं ? " चादण्यांचा गंध जेव्हा , पोर्णीमेच्या रात्रीला " येतो तेव्हा कायमच ' चंद्र आहे साक्षीला , चंद्र आहे साक्षीला
आणखी पुरावा पाहिजे असेल तर तो " शुक्र तारा दिसतोय ? " त्याला विचार तो ही सांगेल " चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातूनी "
हो रे चंद्र हा खरा जादूगार ; प्रतिपदेपासून पौर्णिमे पर्यत वेगवेगळी जादू या नभांगणात दाखवतो आणि जेव्हा " हात तुझा हातात अन धूंद ही हवा , रोजचाच चंद्र आज भासतो नवा" .
ओ हो , क्या बात है " हसले मनी चांदणे , जपून टाक पाऊल साजणी , नांदतील पैंजणे"
बरं हा! , मग " चांदण्यात फिरताना माझा धरलास हात , संख्या रे आवर ही सावर ही चांदरात "
अगं, एवढ्यात कुठं आवर ? तरुण आहे रात्र अजुनी
हे कुठलं गाणं? मी तर सध्या 'वरूण आहे मात्र अजुनी ' हेच ऐकतेय
हा तुझी काय चूक म्हणा , या विडंबनकाराचा इतका सुळसुळाट झालाय की मूळ गाणे ' तरुण आहे रात्र अजुनी ' असं सांगावं लागतंय
पण सांगू ? मला काय वाटते ते निवडणूक करूनच जाऊ , दिवाळी करूनच जाऊ असं जे पाऊस म्हणतोय ना ते खोटं आहे . मला वाटतंय त्याला यंदा ' कोजागिरी ' कशी साजरी करतात हे बघायचे असेल.
पण मग आता रे ?
मगाशी सांगितलं ना "आमचं ठरलंय"
परत तेच
अगं, चंद्राच्या त्या मैत्रिणी आहेत ना त्यांना सांगितलय, यंदा चादणं ढगाआड राहीलं आणि " कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर " अशी अवस्था झाली तर यंदा दिवाळीत आपण सगळ्यांनी ' चांदणी ' चा आकाशदिवा लावून सारं तारांगण गावा गावातून उतरवायचं
तेव्हा ठरलय आता
*नवीन आज चंद्रमा , नवीन आज यामिनी*
*मनी नवीन भावना , नवेच स्वप्न लोचनी*
आगामी कोजागिरीच्या सर्वाना शुभेच्छा
🙏🏻💐🌝
📝अमोल
poetrymazi.blogspot.in

No comments:
Post a Comment