निघालो_घेऊन_भक्तांची_पालखी 🚩🌷
(आधी पोपोबा आता विठोबा *)
विठोबाच्या मार्गी । नमोबा आले ।
तो झाला सोहळा। आँनलाईन II
भरवीला पाया । पंढरीसी थेट
। उरामधे पताका I वैष्णवांची II 🚩
हरी म्हणे “नम्या। तुझे कर्म थोर;
अवघाचि संसार । सोडूनी दिला।।”
नमोजी म्हणे । एक ते राहिले; ।
अच्छे, आश्वासन इलेक्शनचे !!
माऊली म्हणे, “बाबा ते बरे न केले,
त्याने तडे गेले। संसाराला II
नमो,पुन्हा म्हणे । माझ्या शब्दामुळे
वाट्टेल ते खेळले । भक्तांतीत II
विठू म्हणे गड्या । वृथा शब्दपीट
प्रत्येकाची वाट । लावलीसी II
वेगळिये वाटे । वेगळिये काटे;
परि तसेच वागे । तूझाही पक्ष II
ऐक ऐक वाजे । घंटा ही पोपची।
कॅमेरा बाहेरी । वाट पाहे.” II
दोघे लाँगाऊट I गेले दोन दिशां
कवतिक भक्तांना आवरेना । 😎✌🏻💐
( विनायकी चतुर्थी, ८/११/२१ 📝)
*काल्पनिक, मनोरंजन हा हेतू
No comments:
Post a Comment