नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, November 22, 2021

पहाटे पहाटे मला जाग आली २ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल...📝


पहाटे पहाटे मला जाग आली

अपुल्या सत्तेची कृती फेल झाली


मला आठवेना.. तुला आठवेना 

कशी रात्र गेली कुणाला कळेना

तरीही काकांना खबर लागली


अपुल्या सत्तेची कृती फेल झाली !


सत्तेचे डोहाळे, निमित्य कशाला?

बाजू ठेऊ या 'हात' नको ' बाणाला' 

मनमिळाऊ तात्या हे राज्यपाली


अपुल्या सत्तेची कृती फेल झाली !


कसा रामपारी सुटे गार वारा

माझ्या खुर्चीला देशील का सहारा

करु सुरवात बोलणे, हालचाली 

अपुल्या सत्तेची कृती फेल झाली !पहाटे पहाटे मला जाग आली

अपुल्या सत्तेची कृती फेल झाली ! 🌷⏲️


कार्तिक कृ चतुर्थी ( २३/११/२१)

अंगारक योग

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...