आठवणीतले भोंगे 📣
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वरुन अमुक वाजून तमुक मिनिटाला जाण्यासाठी लोकल ( किंवा मेल/ एक्सप्रेस) तयार असते. इंडिकेटरने ती वेळ दर्शवली की गार्ड शिट्टी मारून मोटरमनला संकेत देतो ( अंतर्गत प्रणाली द्वारे) अन् क्षणात एक मोठा भोंगा देऊन गाडी सुटते ( भले ती गाडी मुक्कामाच्या ठिकाणी किती ही लेट पोहोचू दे निघण्याची वेळ मात्र अगदी परफेक्ट)
लोकलचा हा भोंगाच. हाँर्न वगैरे उल्लेख करणे हे माझ्यामते कमीपणाचे ठरेल. जत्रेत मिळणाऱ्या भोंग्या पेक्षा आकाराने थोडा मोठा असणारा भोंगा लोकलच्या प्रथमदर्शनी भागात लावलेला दिसतो.
संध्याकाळी १७:५० ला असाच एक मोठ्ठा भोंगा देऊन कोल्हापूर कडे निघालेली सह्याद्री एक्सप्रेस,पहाटे ४ च्या सुमारास शेरी नाला ओलांडला जाताना, त्याचवेळी वाजणा-या साखर-कारखान्याच्या भोंग्याशी स्पर्धा करत सांगलीत पोहोचते.
त्यानंतर साधारण १ तासाने म्हणजे ५ च्या सुमारास शांतीनिकेतन वसतीगृहात लाउडस्पीकर वरुन लागणाऱ्या भूपाळ्या/ अभंग/ आरत्या पहाटेच वातावरण भक्तिमय करुन जात असत.
माधवनगर काँटनमिलच्या वेगवेगळ्या कामाच्या वेळेतील भोंगे आणि सांगलीतील रात्री ( ८:३० वाजता) नित्य वाजणारा भोंगा, वेळेची जाणीव करुन ठरणारा असायचा.
याबरोबरीनेच दर महिन्याला रात्री एक जास्तीचा भोंगा सांगलीत वाजायचा, जो आजही वाजेल ९:४५ ला
म्हणजेच संकष्टीला ,चंद्रोदय झाल्यावर
असे काही भोंगे जीवनाचा एक अगदी सहज भाग बनून गेले होते,राहतील
#आठवणीतील_भोंगे 📝
अंगारकी संकष्टी
१९/०४/२२
No comments:
Post a Comment