नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, July 4, 2023

पहाटे नंतर आज पाहिली


 वसंत बापटांची माफी मागून

( * मनोरंजन हा हेतू)

मुळ गाणे: शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट


पहाटे नंतर आज पाहिली दुपारची विल्हे-वाट 


पक्ष फुटले   , सदन गहिवरले

सत्तेसाठी नव गणित जमविले

'देवगिरीत' जे जाऊनि जमले,मंत्रीपद फटक्यात


आजवरीच्या अंधारात

अनंत झाले उल्कापात

एकवटोनी तेज फुटीचे तिमिर सरे घनदाट


फकिरांनी शत यज्ञ मांडिले

ईडीमध्ये तेच दाखले

त्या शक्तीची राष्ट्रावर ये 'अजीत' 'एक'च लाट


दीप पेटवूनी कार्यालयाचे

पूजन केले स्वातंत्र्याचे

त्या राड्याची ठेच लागुनी झाले आज विराट


पुरेत अश्रू दुबळे क्रंदन

भावपूर्ण करु विनम्र वंदन

नव समिकरणाचे होऊ आम्ही 'सिल्व्हर शाही' भाट


पहाटे नंतर आज पाहिली दुपारची विल्हे-वाट 


* माझी_टवाळखोरी 📝

५/०७/२३

www.poetrymazi.blogspot.com

Sunday, July 2, 2023

सावधान


 #सावधान 


आज डोंबिवलीत एका वधू-वर मेळाव्यास उपस्थित राहिलो. लेटेस्ट ट्रेन्ड काय चालला आहे हे बघायला मिळाले. पूर्वी वेस्टनच्या मुली सेंट्रल चा मुलगा पसंत करीत नसत.


 आज या विचाराचे अँप अपग्रेड झालेले बघितले


 चक्क डोंबिवली (पूर्व) च्या मुली डोंबिवली (पश्चिम) ला जात नाहीत असं एका मुलाची आई खेदाने सांगत होती.


नशीब हा ट्रेन्ड आत्ता सुरु झाला. आमच्याकाळात सांगलीत असा काही विचार नव्हता.  असता तर, 'नाही हं ! मला साखर कारखान्यावरचा मुलगा अजिबात नको,गुलमोहर काँलनीतलाच पाहिजे  फारतर विश्रामबाग परिसरातील चालेल असं सांगून आमची केस त्याचवेळी रिजेक्ट झाली असती. 

 एक गोष्ट जाणवली ती म्हणजे  मंगळ, एक- नाड, सगोत्र या गोष्टी आता इतिहासजमा होत आहेत किंवा तसा विचार सुरु झालाय

असो.


 मेळाव्याचे आयोजक माझे साडूच होते. त्यांच्यामुळे माझ्या कार्याची म्हणजे पत्रिका बघणे वगैरेची अनायसे जहिरात झाली.


आता त्यांचा पुढचा मेळावा १६ जुलैला पुण्यात आहे तर पुण्यातील ज्या मुलींना कोथरूड/बावधनहून सहकारनगरला जायचे नाही, विमाननगरहून पाषाणला यायचे नाही त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी पुण्यात आहे एवढेच सांगतो.😬


 शेवटी तमाम लग्नाळू वधू -वरांचे २,७ ( आणि साडू-साडूंचे ११वे स्थान)  अँक्टीवेट होऊन, "शुभ_मंगल"  होवो याच यानिमित्याने शुभेच्छा 

💐💐


#स्वप्नपुर्ती_विवाह_मंडळ_पुणे

#माझी_टवाळखोरी 📝

२/०७/२३

Sunday, June 18, 2023

आषाढस्य प्रथमदिवसे


 आषाढस्य प्रथमदिवसे

ऊन पडलं लख्ख....।

सूर्याला ही  बघायचा होता

महाकवींचा 'मेघ-दूत' चक्क 🌤️ !!


नाराज झाली  धरणी, वर्षा

नाराज झाल्या सर्व सरिता ।

आता तरी पडू दे पाऊस

वाचून ही टूकार कविता !!


आषाढ शु प्रतिपदा


१९/०६/२३ 

माझी_टवाळखोरी 📝

Thursday, June 15, 2023

मान्सून_पूर्व_कविता


 'बेडकाच्या' सतत ओरडण्याने 🗣️

'हत्ती' ला झाली कानदुखी 🙀

मेंढा, गाढव, कोल्हा, म्हैस

शोधून दमले कुणाची चुकी


गंमत पाहून सगळ्यांची

पावसाला आवरेना हसू..

आपण तर साधी माणसं

सांगा, विकेंडला कुठं, बसू ? 😝


#मान्सून_पूर्व_कविता 

#अराजकीय

#पावसाळी_वाहन

#माझी_टवाळखोरी 📝

Tuesday, June 13, 2023

जहिरातीतील मर्म


 कवी नारायण सुर्वे यांची क्षमा मागून ( परत एकदा)

*मनोरंजन हा हेतू

--------------------------------------------------


दोन दिवस मुंबईत  गेले, दोन दिल्लीत गेले

हिशोब करतो आहे आता,  किती पैसे भुरर्कन उडाले 


शेकडो वेळा फोन आला, इमेल आले, बोलणी सुरु झाली

जहिरातीतील मर्म शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली


कालच्या जहिरातीतील माझे टक्के , जनतेकडेच  गहाण राहिले

भाकरी सारखं आज जहिरातीलाही फिरवून पाहिले


दरवेळी बंडखोर वळविले असे नाही; पण असेही क्षण आले

तेव्हा शत्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले


भोळ्या जनतेचा  विचार हरघडी केला, अन नेता झालो

पडणारी सीट , कशी जिंकून द्यावी , याच जहिरातीत शिकलो


न्याय-आयोगाने चिन्हाचे धनुष्य  छान पेलले 

दोन दिवस मुंबईत  गेले, दोन दिल्लीत गेले


अमोल 

जेष्ठ कृ एकादशी 

१४/०६/२३

------------------------------

माझी_टवाळखोरी 📝 *

Thursday, May 25, 2023

आज मैदानात डाँट खेळला जरी


 "एक 'डाँट' चेंडू,  ५०० झाडं खड्डयात" हा नवीन नियम ऐकल्यार आजच्या सामन्यासाठी रोहितला सल्ला 📝



आज मैदानात डाँट खेळला जरी

रोहित्या, खड्डा जपून कर तुझ्या घरी 🌳🏏


तो चतुर विकेटखोर बाँल टाकतो

हात उंचावूनी जोरात अपील करतो

DSR घेऊनी खुशाल फासा टाकतो

याॅर्कर जरा येऊनी, तुझ्या पदो-पडी


रोहित्या, खड्डा जपून कर तुझ्या घरी 🌳🏏


सांग सुर्य-कुमारास काय जाहलें

रन काढल्याविना कुणा न सोडले

ज्यास त्याच चौ-कार, षट-कार काढले

एकटाच वाचशील काय तू तरी


रोहित्या, खड्डा जपून कर तुझ्या घरी 🌳🏏


त्या तिथे  चिअर्सगर्लचा डान्स रंगला

शेठ- मालका सवे प्रेक्षक दंगला

तो पहा गुजराथला मृदुंग वाजला

*हाय!  भाजली फिरून तीच भाकरी*😷


रोहित्या, खड्डा जपून कर तुझ्या घरी 🌳🏏


#माझी_टवाळखोरी 📝

२६/०५/२३

Friday, May 19, 2023

ती आली तेंव्हाही


 

२००० च्या नोटेला समर्पित 

( कवी ग्रेस यांची माफी मागून)


ती आली तेंव्हाही, खिसा असाच मोकळा होता

जमा खर्चाचा ताळेबंद हा कवी सोडवत होता


तिथे 'चिप' होती म्हणूनी, सावधतेने मी वावरलो

त्यावेळी जो तो चावट, 'अच्छी नोट' म्हणत होता


बँकेत समजले मजला,संपला बॅलेन्स माझा

खिडकीवर कॅशियर तेंव्हा,गालात हसत होता


ती आज जातानाही, मज गहिवर नाही

वस्ताद रूपया तो,तसाच वाकडा होता

www.poetrymazi.blogspot.com

Tuesday, April 18, 2023

दादा बोलंना


 कमळीचे मनोगत 🪷

( * मनोरंजन हा हेतू)


दादा बोलंना, दादा चालंना,

दादा खंत करी ,( परी) काही केल्या गावंना s s s

दादा बोलंना ..


गेलो प्रभातीच्या वेळी

घेतली शपथ एक काळी

आम्ही 'हातात - हात' घालून रे

चल ये रे ये रे गड्या, नाचु उडू घालू फुगड्या

खेळू विका- कास घरी ,थीम् धरी थीम्


दादा बोलंना ..


महा- राष्ट्राचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण

'उन्हे' पळवू आपण दोघेजण

जन विषयाचे किडे,ज्यांचीधाव इडिकडे

आपण करु सगळ्यांना 'शुध्द' रे


दादा मुळी न आला फुलून

न्यूज वाले  गेले आटून


कोण हा दादा! त्यांचा एकच 'वादा' रे !


#माझी_टवाळखोरी 📝

www.poetrymazi.blogspot.com

१९/०४/२३

Tuesday, April 4, 2023

फडतूस' आणि 'काडतूस' *


 'फडतूस' आणि 'काडतूस' *

( * प्रासंगिक मनोरंजन हा हेतू)


राजकारणी लोकांनी या दोन शब्दांना वलय प्राप्त करुन दिले असले तरी लहानपणापासून सांगली सारख्या गावात या शब्दांचा मुक्त वापर आम्ही मित्र-मंडळी करायचो


आजच्या सारखे भरमसाट सिनेमे नसताना आणि त्याचे रिव्ह्यू / रेटींग नसताना एखादा   सिनेमा बघून आलोय हे कळल्यावर दुस-या दिवशी शाळेत जाताना चर्चा व्हायची,


 'कसा आहे रे सिनेमा ' ?

( तो सिनेमा चांगला/ बरा असला तरी  ठरलेले उत्तर )


फडतूस रे,  एकदम फडतूस. 

 अजिबात बघू नकोस. 


थर्ड क्लास हा शब्द आम्ही मित्र वापरतच नसू कारण याचा कुठेतरी संबंध डिग्रीशी  ( पोलिसी/ शैक्शणीक योग्य वाटेल तसे घेणे ) येत होता, आणि आपलं पितळं उघडं पडेल याची तेंव्हा भिती मनात वाटायची

 त्यामुळे फडतूस हा शब्दच फिट्ट होता 


फडतूस सिनेमातील दृश्यांचे वर्णन ऐकत / ऐकवत  जेंव्हा आमचा घोळका शाळेजवळ यायचा तेंव्हा तिथले जनता जनरल स्टोअर्स बघून अचानक एका मित्राची ट्यूब पेटायची आणि म्हणायचा,

अरं, काल मी मसाला गोळ्या घ्यायला पैसे दिलेले की लेका तुला, 


आता 'फडतूस'  सिनेमा ठेव बाजूला,मसाल्याच्या गोळ्या खिशातून ' काडतूस' का नाहीस सांग 


 किती त्या फडतूस शिनेमावर चर्चा करायलाय ☺️


#माझी_टवाळखोरी 📝

०५/०४/२३

poetrymazi.blogspot.com

Thursday, March 30, 2023

संपता इयर हे


 सर्व सेल्समन ना समर्पित :-



(मुळ पद ; गुंतता हृदय हे )


संपता इयर हे

संपता इयर s s s हे,आजच्या दिवसा पाशी

हा सेल्समन अडखळे तुझ्या दाराशी


संपता इयर हे


हा इथे जाहला संगम नफा तोट्याचा

प्राक्तनी आपुल्या योग तो फिरण्याचा

अद्वैत आपुले जुळते सेल्स टार्गेटशी

हा सेल्समन अडखळे तुझ्या दाराशी


संपता s s  इयर हे


सुदैवी आपण , सुखावलो या क्षेत्री

सहवास वाढता, झळाळले ऋण तेही

स्मर एकच तेंव्हा 'ग्राहक' निज हृदयाशी


संपता इयर हे ,आजच्या दिवसा पाशी

हा सेल्समन अडखळे तुझ्या दाराशी


( एक सेल्समन 📝)

३१/०३/२३

www.poetrymazi.blogspot.com

Saturday, March 4, 2023

कुणी माझ्या मतात लपलयं रे


 ज्या निकालाची तीस देशांनी नोंद घेतली त्यावर आजची #रविवारची_टवाळखोरी 


दादांनो, ताईंनो, काकांनो, काकूंनो

तेरी भी चूप, मेरी भी चूप

कुणाला काही सांगू नका

कबूल? 


"कसबा राजा" ऐट दावतो

गुपित जपलंय रे..

कुणी माझ्या मतात लपलयं रे

कुणी माझ्या मतात लपलयं रे


ते दिसले, अन आम्ही पाहिले

पाहिले परि ते सा-यांने

डोळ्यात इशारे हसले

हसले ते मोठ्या तो-याने

हे कसे न त्याला कळले

कळले आता नि-कालाने

'मत' न पडले, मन न जुळले

थोडं ( ? ) चुकलं रे


कुणी माझ्या मतात लपलयं रे

कुणी माझ्या मतात लपलयं रे


तो भाव 'मताचा ' दिसला

दिसला मग 'संशय' कसला?

हा नखरा का मग फसला

फसला हा अल्लड चाळा

पेठेत बहाणा असला?

बसला उमेदवार तो भोळा

प्रीत अशी परी रीत अशी का?

कोडं सुटलयं रे


कुणी माझ्या मनात  लपलयं रे

कुणी माझ्या मनात  लपलयं रे


#माझी_टवाळखोरी 📝

०५/०३/२०२३

poetrymazi.blogspot.com

Thursday, February 23, 2023

सखी बंद झाल्या मालिका


 #प्रासंगिक


प्राईम टाईम मालिका प्रेमी "हॅलो सखीस,


सखी बंद झाल्या मालिका

आता तरी बोलशील का?


जहिरात जास्त देखणी

नाही आज पाहिली कुणी

हा प्रहर जालीम जाहला

री- मोट तू  ठेवशील का


ताटात आहे अन्न पण

लक्षात आहे गीतही

ते भान-गडी छेडणारे

"ए-पी सोड" तू सोडशील का?


जे जे नको ते जीवनी

ते सर्व आहे दाखविले

तरीही उरे काही उणे

तू पूर्णता: थांबशील का?


सखी बंद झाल्या वाहिन्या


( प्रासंगिक)  अमोल 

१९/०२/२३

#माझी_टवाळखोरी 📝

गुरु शुक्र युती - मीन रास


 


Friday, February 3, 2023

माझी विडेंनबर्ग_गिरी


 प्रासंगिक ( विडेंनबर्गीरी)  📝


अदानीच्या शेअर्सनी,लाल लाल तक्त्यांनी

'लाॅस-रेट' माझा मीच काढीला

ब्रेक आता लागलाय मार्केट वाढीला


'शाॅर्ट- सेलिंग' टेक्निक लाख-मोलाची

आली आता वेळ 'फेल होण्याची

गुंतवले  पैसे-मोर, रुपे-मोर जोडीला

ब्रेक आता लागलाय मार्केट वाढीला


जात होता वाटेनं तो तो-यात

अवचित आला शनी कुंभेत

तुमच्या आता गर्वाचा फुगा कसा फुटला 

ब्रेक आता लागलाय मार्केट वाढीला


चीड आता पहा इन्व्हेस्टरची

इज्ज्त थोडी ठेवा आपल्या ग्रुपची

काय आता म्हणावे, 'हिंडेनबर्गच्या' खोडीला 😉

ब्रेक नका लाऊ मार्केट वाढीला


अमोल 

#माझी_टवाळखोरी 📝

poetrymazi.blogspot.com

०४/०२/२३

Thursday, February 2, 2023

बजेट २०२३: कोणता पर्याय घेऊ हाती


 २०२३ च्या बजेट नंतर आम्हाला सुचलेले गाणे *


' *निर्मला ,कोणता पर्याय घेऊ हाती* ' 

( मुळ गाणे: विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती )


नोकरीच्या पैशाचा भरावा टॅक्स, भरण्याच्या पर्यायाचे धुके घनदाट

आपली मेहनत,आपलीच खाती, ख-या इंन्कमची आपणास भिती

' *निर्मला ,कोणता पर्याय घेऊ हाती* '


आजवर ज्यांची केली मी पावती, भलताच त्याचा अर्थ होता

पुरे झाली आता उगा माथेफोडी, पैशात माझा जीव होता

वाचवाया टॅक्स म्हणुनीया किती चाकरमानी खाती माती

'स्किम' कोणती आहे? वेळ कोणा आहे?


*निर्मला ,कोणता पर्याय घेऊ हाती* '


सेव्हिंग्जदाखवण्यातच व्यर्थ हे जगणं,उभ्या उभ्या संपून जाई

पासबुक माझं रितं  बघुनी उमगलं ,कुंपन हितं शेण खाई

भक्ताच्या कपाळी फा‌ँर्म सोळा तरी, लाख वेगळे, वेगळे कोटी

टॅक्सेबल रिती, टॅक्स हीच भिती


*निर्मला ,कोणता पर्याय घेऊ हाती* '


माझी_( टॅक्सेबल)_टवाळखोरी 📝

०३/०२/२२

( टिप: * मनोरंजन हा हेतू)

Monday, January 16, 2023

साडेसाती संपता संपता





 

Sunday, January 15, 2023

चढाओढीने भांडत होते





आज खास #क्रिंकांत निमित्याने ( मुळ गाणे: बाई मी पतंग उडवीत होते )

चढाओढीनं भांडत होते, ग बाई मी प्रसिध्दी मिळवीत होते

चित्रा ताईंचा चढला पारा

ट्विट केले हो अकरा बारा

एकमेकांना अडवितं होते

ग बाई मी प्रसिध्दी मिळवीत होते.


काटाकाटीचा बेशरम रंग

जो तो युध्दात आमच्या  दंग

दैव हारजीत घडवीत होते 

ग बाई मी प्रसिध्दी मिळवीत होते


माझ्या धनुष्याचा तुटला दोरा

पोलिस ठाण्यात मारल्या चकरा

गुंता सोडवायला मामा-मामी होते

ग बाई मी प्रसिध्दी मिळवीत होते


अमोल

१६/०१/२३

#किंक्रांत

#माझी_टवाळखोरी

poetrymazi.blogspot.com

 

Tuesday, January 3, 2023

उर्फी ' साजूक 'चित्रातली'


 - नववर्षात आलेली  पहिली ऊर्मी  😷 ( प्रासंगिक)


पहिल्या तारखेचा प्रेमानं सल्ला

सोशली  सगळं  हे बाद

ही ' उर्फी ' साजूक 'चित्रातली'

तिचा 'वाघानं' घातली साद


'इन्स्टा' वरुन करु नको इशारा

भिडू दे आता डोळ्याला डोळा

इथं बी 'मेटा' तिथं बी 'कुटी'

जोसानं ट्विटू दे आग


( ही ' उर्फी ' साजूक 'चित्रातली'

तिचा 'वाघानं' घातली साद )


वरुन जरी हा सेट(ल)मेट झाला

खबर लागली 'अंधार'वाडीला

लागलाय आता तोल सुटाया

वादाची उठलीया लाट


( ही ' उर्फी ' साजूक 'चित्रातली'

तिचा 'वाघानं' घातली साद )


अमोल 📝

०३/०१/२०२२

#साजूक_वाद 

poetrymazi.blogspot.com

Saturday, December 31, 2022

नववर्ष स्वागत


 ऋणानुबंधात सामावू

वर्ष आता हे सरणारे...

सुख,दु:खाच्या गोष्टींना

योग्य कप्प्यात ठेवणारे...


आयुष्याच्या पुढील टप्प्यात

या आठवणी येतील कामाला

सध्या तरी तयारीत राहू

नव वर्षाच्या स्वागताला


अमोल 📝

३१/१२/२२

poetrymazi.blogspot.com

Sunday, December 18, 2022

अरे 'अर्जें-टिना' झाला सी पावन


 FIFA वारीतील अंतिम सामना पाहिल्यानंतर सुचलेला अभंग


अरे  'अर्जें-टिना' झाला सी पावन ⚽

'मेस्सी' तुझे ध्यान कळों आले


तुझा तोची 'गोल' तुझा ,काय भाव

मिटला संदेह गोलक्षेत्री


दिपीका हसत मैदानात आली

'वल्ड कप ट्राॅफी' धन्य झाली


'एम्बापेची' वृत्ती आपले वर्चस्व

अवघे बरोबर चतुरस्त्र


अडवूनिया गोल 'एमिलिनो' चित्ते

'फ्रान्स' मग दिसे रिते राया


प्रेक्षकी परम अनुभव घेवा

'पेनल्टी' अंतीम, निर्णय देवा


अरे  'अर्जें-टिना' झाला सी पावन ⚽

'मेस्सी' तुझे ध्यान कळों आले


( गीत  किपर.)  अमोल 📝

१९/१२/२२

#माझी_टवाळखोरी 

#मेस्सी_जैसा_कोई_नही

Related Posts Plugin for WordPress, Blogger...