अधिक महिमा ➕
मंडळी नमस्कार 🙏🏻
इंग्रजी कालनिर्णयानुसारचे सन २०१९ वर्षातील शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत . नवीन वर्ष २०२० च्या दिनदर्शिकांची खरेदी ही एव्हांन अनेकजणांची झाली असेलच . आजकाल मोबाईल मध्ये पुढील ५० वर्षांपर्यत ( किंवा त्याहून जास्त ) च्या दिनदर्शिका जरी मिळत असल्या तरी दरवर्षी भिंतीवरील दिनदर्शिका घेऊन नवीन वर्षात सुट्ट्या केव्हा आहेत हे पहाण्याची मजा अजूनही मी घेतो. सर्वात पहिल्यांदा नवीन वर्षात आपला वाढदिवस कोणत्या वारी आहे , रविवारला लागून कुठल्या सुट्ट्या आल्यात , गणपती केव्हा आहेत ? इ इ .
एखादा जोतिषी असेल तर वर्षात होणारे ग्रहांचे राशीबदल , ग्रहणे इ गोष्टी त्याच्यासाठी आपुलकीच्या असू शकतील. धार्मिक कार्य करणा-यांसाठी विवाह - वास्तू - व्रतबंधन मुहूर्त आपुलकीचे होऊ शकतात .
तर मंडळी यंदाच्या २०२० साल हे समस्त जावई मंडळींसाठी ही विशेष आहे कारण सप्टें / ऑक्टोंबर मध्ये येणारा अधिक महिना ( अधिक अश्विन).
अधिक महिना का असतो, त्याचे महत्व वगैरे ही माहिती आत्ता तरी आपल्याला घ्यायची नाही आहे पण या " अधिक ( + )" शब्दाशी आपण कसे परिचित आहोत हे पाहण्याचा केलेला हा एक ( टुकार ) प्रयत्न.
लहानपणी गणित शिकताना अधिक ( + ) हा शब्द पहिल्यादा आपण शिकतो/ आपल्याला समजतो. माझ्याबाबतीत बरीचशी बेरीज ( अधिक + ) असलेली गणिते वजाबाकी असलेल्या गणितापेक्षा जास्त बरोबर आली आहेत किंवा वजाबाकीच्या गणितां पेक्षा बेरीज असलेली गणिते मला जास्त आवडायची . थोडे मोठे होत गेल्यावर परीक्षेत अगदी इतर विषयाच्या पेपरात ' अधिक + पुरवण्या ' लावण्या एवढी मजल मात्र मी मारू शकलो नाही .
अधिक / जास्त / अजून या गोष्टीशी आपले नाते मानवी स्वभावानुसार अगदी नैसर्गीक आहे कारण जन्माला आल्यापासून आपले 'शारीरिक वय ' हे वाढतच असते ( अधिक + ) , उणे कधीच होत नाही. ' मार्केटींग स्कीम ' मध्ये या ' अधिक + ' गोष्टीचा अगदी पुरेपूर वापर केलेला दिसतो. २ गोष्टींवर एक गोष्ट फ्री ( अधिक ) , अमुक एक गोष्ट अमुक कालावधीत घेतली तर तिसरी एखादी गोष्ट अधिक मिळेल , एखादी पॉलिसी/ ट्रॅव्हल प्लॅन / एखाद्या क्लबची मेंबरशीप घ्या आणि ही ( अधिक + ) बक्षिसे मिळवा इ इ इ.
दिवाळी/ होळी साठी कोकणात सोडण्यात येणा-या जादा ( अधिक ) रेल्वे , पंढरपूर यात्रेसाठीच्या अधिक बसेस, दिवाळीत काही नशीबवान कर्मचा-यांना मिळणारा बोनस ( अधिक ) एखाद्या उत्तम कलाकाराने सादर केलेली कलाकृती याला मिळालेला ' वन्स मोर ' ( अधिक + ) , शनिवार/ रविवार काही मालिकांचा सादर होणारा एक तासांचा विशेष ( अधिक + ) भाग , कुठल्याही मॉल मध्ये सिनेमाच्या तिकिटाबरोबरच खादाडी करण्यासाठी घेतलेला ( अधिक + ) कॉम्बो पॅक , मराठीतील काही म्हणी जशा ' आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास ' किंवा 'दुष्काळात तेरावा महिना' या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी " अधिक + " शी संबध येतो असे वाटते . अगदी आजारी पडलो , अपघात झाला तर आयुष्यमान वाढण्यासाठी जिथे आपण पोचतो त्या जागेचे चिन्ह ही ' लाल रंगात + ' हेच असते.
आणि शेवटी ते म्हणतात ना
' नॉट बट लिस्ट ' का काय ते .
राजकारण ? होय राजकारण या प्रकारातही आपण अनेकदा ' बेरजेचे राजकारण ' ऐकतो / पहातो की + ✌🏻
तर असा हा " अधिक + महिमा" आपणास आवडला असेल. तर सन २०२० हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारीही १ दिवस अधिक घेऊन आला आहे. आधी लिहिल्याप्रमाणे सर्व जावयांसाठी ' अधिक मास ' पर्वणी आहेच . पण कधी तरी वाटत ही 'अजून अजून / अधिक अधिक' ची हाव मर्यादित हवी . एकंदर मिळणा-या गोष्टीत समाधान आहे/ बास आता अजून अधिक नको . किती पळायचे त्या अधिक/अधिक च्या मागे? असे वाटणे ही महत्वाचे .
लेखनाचा शेवट ' धीर ' धरी असा मोलाचा सल्ला देऊन
होसी का भयकंपित धरसी का शंका
गाजतसे वाजतसे तयाचाच डंका
'जय गोविद' 'जय मुकूंद' 'जय सुखकारी'
धीर धरी धीर धरी जागृत गिरिधारी
📝अमोल
१७/१२/१९
poetrymazi.blogspot.in
# ' अधिक ' ( + ) चांगलं लिहायला पाहिजे अजून असं सतत वाटून सतत लिहिते राहणा-या समस्त लेखक लेखिका/ कवी, कवयित्रींना समर्पित 🙏🏻

No comments:
Post a Comment