नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, December 6, 2019

स्क्रिन शाॅट


# स्क्रीन शॉट

 तुम्ही जो संगणक , लॅपटॉप , स्मार्टफोन  वापरता/ बघता  त्याच्या स्क्रीन / दृश्य भागाचा हुबेहूब फोटो काही  युक्ती वापरून घेणे  म्हणजे "स्क्रीन शॉट" घेणे.
जे  स्मार्ट फोनसारखी आधुनिक उपकरण वापरत आहेत त्यांना हे काही नविन नाही.

 आता तर अनेक फोन मध्ये "स्क्रिन शाॅट"  घेण्यासाठी  विशेष सोय  असते .संगणकात ही " प्रिंट स्क्रीन"  म्हणून पहिल्या पासून एक आॅप्शन आहे.

 पूर्वीच्या म्हणजे साधारण ५-६ वर्षांपूर्वीच्या स्मार्ट फोन मध्ये मला अजून आठवतंय "स्क्रीन शॉट " घेणं हे खायचं काम नसायचं .  ते व्हॉल्यूम आणि  मोबाईल चालू बंद  करायचं बटन एकाचवेळी दाबून चित्र पकडावं लागायचं. मला हे जमायला खूप वेळ लागला होता. ब-याच वेळा मोबाईल बंद व्हायचा. व्हॉल्यूम कमी जास्त व्हायचा  पण शंभर प्रयत्नात एकदाच तो फोटो मिळायचाच.

 त्यामानाने आता काम खूप सोपं झालाय. एका टिचकीसरशी स्क्रीन शॉट निघू शकतो.

तुम्ही म्हणाल हे काय हे लिहितोय आज ?
 मंडळी  आपल्याला सुचला विषय की आपण लिहितो. बरेच लेखन हे आपण त्या अनुभवातून गेल्यावरचे ही असते. आजचे लेखन ही जरा असेच हटके म्हणा हवं तर

थोडासा वेगळा विषय.
लहानपणी आपण अनेकदा भाडणं केलीत  मग ती  भावंडांच्यात असोत किंवा मित्रांच्यात असोत . परिस्थिती नुसार  ती  भांडणे वडिलधा-यांकडे , शाळेतील शिक्षकांकडे  जायची , मग असा काही संवाद व्हायचा

हा बोलं काय झालं

सर, असं असं झालं

का रे तू  असं बोललास ?

नाही सर , हाच असं म्हणला  वाटल्यास  तमक्याला  विचारा

कोण आहे रे तिकडे , बोलव तमक्याला

हा सांग रे तू  आता सगळं खरं

सर तो अमका आहे ना त्यानेच सगळं केलय

तुम्हाला सगळ्यांना शेवटची सूचना देतोय , परत असं होता कामा नये .
 संवाद समाप्त

हे लहानपणीचे सगळे अमके , तमके आता मोठे झाल्यावर   कुणी नक्की काय म्हणले , काय चर्चा केली हे आता "स्क्रीन शॉट" काढून  पुरावे द्यायला लागेलत

"स्क्रीन शॉटची टिचकी , गोत्यास काळ " 😬

तर असा हा "स्क्रिन शाॅटचा" महिमा

आपल्याकडे 'आरसा ' हा आपलं बाह्यस्वरूप पाहण्यासाठी वापरली जाणारी वस्तू. पण अशी ही एक गोष्ट  असायला पाहिजे होती की मारली टिचकी आणि आपल्या मनात काय चाललंय  याचा "स्क्रीन शॉट" मिळेल.

बरं का मंडळी,  आता मनात काय चाललंय हे "स्क्रीन शॉट" शिवाय ही  कळलं असत की, पण  आपलं ना "कळतंय पण वळत नाही " असं झालय. आधूनिक प्रणाली हाताशी असली कीच  ते खरं वाटत .

नामस्मरण, प्राणायाम या सगळ्या गोष्टीतून चिंतन, मनन हे सगळं विसरून आपण भलत्याच गोष्टीच्या आज मागे लागलो आहोत आणि बाह्य गोष्टीवरच जास्त अवलंबून रहायला लागलो आहोत हे आपले दुर्देव . थोडंस आपल्या आत आपणच डोकावून, आपण आपलाच "स्क्रिन शाॅट " घ्यायला काय हरकत आहे?

देव करो अन अस गाणं म्हणायची वेळ आपल्यावर येऊ नये:-

भांडणात शिरताना माझा का केलास घात ?
सख्या रे आवर तो , सावर तो "स्क्रीन शॉट "

शिक्षकांच्या खोलीतून
आलो  मी एकटाच
दूर तिथे ' कळ ' लावे
हसले मागे कधीच
ह्या इथल्या वेदना या  सारे जण  जाणतात
सख्या रे आवर तो , सावर तो "स्क्रीन शॉट "

सांग आता तुझ्याविन
भांडू  कसा भरपूर
तुझे शब्द छळवादी
अन हे मित्र फितूर

स्पर्श  तुझा जोरदार , मार होता जबराट
सख्या रे आवर तो , सावर तो "स्क्रीन शॉट "

भांडणात शिरताना माझा का केलास घात ?
सख्या रे आवर तो , सावर तो "स्क्रीन शॉट "

📝 ©अमोल केळकर 🧐
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...