नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, December 9, 2019

तिन तिगाडा काम बिघाडा


तिन तिगाडा काम बिघाडा

काही काही गोष्टींचा आपल्या मनावर एवढा पगडा असतो की तशी वेळ आली की आपोआप मनात विचार येतातच. उदा. तीन जण एका विशिष्ठ कामासाठी एकत्र आले तर आता  या कामात काहीतरी 'बिघाड' होणारच किंवा एखादी गोष्ट सलग दोनदा झाल्यावर आता 'इजा,बिजा,तिजा ' होणारच यावर आपण ठाम असतो. अर्थात असे मत बनण्यात ब-याच दा अनुभवाचा ही वाटा असतो

पण याच ३ अंकाशी आपले फार ऋणानुबंध आहेत. अगदी आपला भूतलावरचा अवतार 'जन्म, जीवन , मृत्यू ' या तीन प्रमुख घटनांशी संबंधित आहे. जीवनप्रवाहात पुढे जात असताना 'भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ' या तीन खिडक्यातून आपण सतत डोकावत असतो. वेगळ्या पद्धतीने सांगायचे झाल्यास बाल्य, तरुण,  वृध्दत्व या ३ अवस्था सर्वसाधारणपणे आपल्याला चुकलेल्या नाहीत. अगदी पत्रिका बघतानाही ज्योतिषी 'लग्न कुंडली',  'राशी कुंडली' आणि 'नवमांश कुंडली' अशा ३ पत्रिका बघतात

सृष्टीचे चे जे चक्र अव्याहतपणे सुरु आहे त्यातही हवामाना प्रमाणे आपण मुख्यत्वे ३ ऋतू येतात:- 'उन्हाळा, पावसाळा, हिवाळा'

लेख थोडासा धार्मिक अंगाने न्यायचा झाल्यास आपण प्रामुख्याने ३ लोक ( स्वर्ग, पृथ्वी, नरक) मानतो. देव धर्म,  पूजा अर्चा, देवदर्शन करतानाही तीनाचे महत्व दिसून येते. साधारण कुठल्याही देवळात देव दर्शन झाल्यावर किमान ३ प्रदक्षिणा आपण मारतो ( किंवा माराव्यात). पूजेच्या वेळी आचमन करताना 'केशवाय नम:, नारायणाय नम:, माधवाय नम: असे तीन वेळा आचमन करुन गोविंदाय नम: असे म्हणून उदक सोडतो.

आपल्या देशाचा राष्ट्रध्वज 'तिरंगा' म्हणून ओळखला जातो तर शत्रूच्या उरात धडकी भरवणारी तीन सेना दले आपल्याकडे आहेत. २६ जाने,  १५ आँगस्ट ला  राष्ट्रगीत म्हणल्यावर 'भारत माता की जय' चे नारे साधारण पणे ३ वेळा देतो

मंडळी म्हणूनच प्रत्येक वेळी एकत्र आलेल्या ३ गोष्टी वाईट नसतात. उद्याचा दिवस तर या दृष्टीने किती महत्वाचा आहे हे वेगळे सांगायला नको. ब्रह्मा,  विष्णू,  महेश या तीन बालकांचा 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त' रुपी जन्म झाला तो मार्गशीर्ष पोर्णीमेला. बाकी यामागील गोष्ट सगळ्यानाच माहिती असेल.

तेंव्हा जेंव्हा जेंव्हा ' तिन तिगाडा काम बिगाडा ' असं वाटेल तेंव्हा तेंव्हा एकच गोष्ट आठवायची

ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला ही दत्तगुरु दिसले. 🙏🏻🌺

असा बदल आपल्यातच झाला की जणू
 ' तिन्ही लोक आनंदाने,  भरुन गाऊ दे ' अशी भावना व्हावी

'तिन्ही सांजा सखे,  मिळाल्या,
देई वचन तुला.

 देणार वचन?   लागायच कामाला परत?
चला,
१, २, साडे माडे , तीन

📝१०/१२/१९
अमोल
poetrymazi.blogspot.in
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...