(पत्र) लिहिण्यास कारण की...📝
महोदय,
आपणा सर्वांस अमोल केळकरचा नमस्कार 🙏🏻
खुपदिवसांनी पत्रासारखे काहीतरी लिहायचा प्रयत्न करतोय. यापूर्वी शेवटचे पत्र बहुतेक दहावीला मराठीच्या पेपरातच लिहिले होते. त्याआधी प्रत्यक्ष पत्र पोस्टकार्डावर किंवा अंतर्देशीय पत्रावर केंव्हा लिहिलेले हे आता आठवतही नाही.
नोकरी लागण्यासाठी अर्ज करण्यासाठी 'इमेल' ने आपले साम्राज्य पसरवून सोय केली होती. त्यानंतर मात्र 'बाॅर्डर' सिनेमातील 'संदेशे आते है' या गाण्याने पत्र आठवली
अगदी अलिकडे 'चला हवा येऊ द्या' मधून सागर कारंडे पत्र सादर करायचा ते आवडायला लागले.
मंडळी या लेखनाचा उद्देश मात्र अगदी वेगळा आहे बरं का. पत्र लेखनातील शेवटची ओळ साधारण कशी असते तर
कळावे लोभ असावा ही विनंती
आपला विश्वासू किंवा आपला स्नेही अशी सर्वसाधारण पणे लिहायची पध्दत. अगदी इंग्रजीत लिहिलेला अर्ज असेल किंवा आजकाल वेगाने होणारे संदेश प्रक्रियेतील इमेल असतील तर
Thanks & Regards
किंवा
Your's Faithfully किंवा Your's Truly या वाक्यांनी आपण लिखाणाचा शेवट करुन आणि खाली आपले नाव / सही करतो. माझ्यामते हे ब-यापैकी सगळ्यांना मान्य होईल.
मात्र आपले नाव लिहिण्याआधी एक विशेषण लिहायचा एक ट्रेंन्ड/ प्रकार गेल्या काही वर्षांपासून मराठी साहित्य जगतात बघायला मिळतोय. याविषयी काही माहिती:-
गेले १०-१२ वर्ष सोशल मिडिया, वेगवेगळी मराठी संकेतस्थळे स्वतःचा ब्लाॅग/ अनुदिनी याद्वारे अनेकांनी विविध विषयावर उत्तमोत्तम साहित्य लिहिले
यात मला दोन व्यक्तींबद्दल लिहायचे आहे ज्यांनी आपल्या लेखनाचा शेवट 'आपला' किंवा 'आपला विश्वासू ' एवढाच न ठेवता ते लिहून खाली आपले नाव लिहिण्यापूर्वी कंसात एक विशेषण जे त्यांनी त्या लेखात लिहिलय त्याला सुयोग्य असेल असे लिहून पुढे आपले नाव ,अशी पध्दत सुरु केली.
ही पध्दत इतकी आवडली की अनेकांनी ( माझ्यासकट) त्या गोष्टीचे अनुकरण करण्यास सुरवात केली. माझ्या मते मराठी साहित्यातला हा एक वेगळा प्रकार यानिमित्ताने पुढे आला आहे.
त्या दोन व्यक्तींची नावे सांगतो
१) तात्या अभ्यंकर ( मिसळपाव या संकेतस्थळाचे मालक, एका अनुदिनीचे लेखक. दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत)
२) धोंडोपंत आपटे ( जेष्ठ ज्योतिषी अभ्यासक, अनेक संकेतस्थळांवर लेखन, "धोंडोपंत उवाच" या अनुदिनीत ज्योतिष विषयक लेखन)
मंडळी या दोघांपुर्वी कुणी अशा पद्धतीने लिहिले असेल तर मला कल्पना नाही. मी पहिल्यांदा असे लेखन या दोघांच्या लेखनातूनच पाहिले.
तात्यांनी 'मिसळपाव' संकेतस्थळावर अनेक लेखांना प्रतिक्रिया देताना याचा खुबीने उपयोग केला आहे.
( मुळ लेखापेक्षा काही काही जणांच्या त्या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया या अभ्यासपूर्ण किंवा छान असतात हे सोशल मिडीयावर फेर फटका मारताना दिसून येते. अगदी आजच्या व्हाटसप, फेसबुक जमान्यात ही केवळ यांची प्रतिक्रिया वाचायला मिळावी असे वाटायला लावणारे काहीजण आहेत. यात तात्या अभ्यंकर होतेच पण नव्याने ओळख झालेले 'मैफल' समुहातील 'ऋतुराज पत्की', कोल्हापूर यांचा ही मी समावेश करीन, याचबरोबर आमचे काही खास मित्र ही आहेतच.
आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया लिहिणा-यांबद्दल परत केंव्हातरी)
पंतांच्या लेखनाच्या शेवटी तुम्हाला मी वर लिहलय त्या पध्दतीची अनेक उदाहरणे दिसतील. काही मोजकी इथे देतो
पंतांचा लेखातून संग्रहित :-
( साईभक्त) धोंडोपंत
( पामर) धोंडोपंत
(स्वामीमय) धोंडोपंत
( सूक्षमदर्शी) धोंडोपंत
( दु:खविलासी) धोंडोपंत
( साक्षीदार) धोंडोपंत
( मार्गदर्शक ) धोंडोपंत
( व-हाडी) धोंडोपंत
( शास्त्रीबुवा) धोंडोपंत
( अानंदित) धोंडोपंत
( ज्योतिर्विद) धोंडोपंत
ही काही मोजकी उदाहरणे ☝🏼. प्रत्येक उदाहरण त्या त्या लेखाशी संबंधित. तात्या अभ्यंकर होते, पंत असतील, आज अनेक जण आपल्या लेखनाचा शेवट आपल्या नावाआधी एक विशेषण लावून करत आहे. अर्थात मी ही याला अपवाद कसा ठरेन?
क.लो.अ.ही.वि.
आपलाच
( अती टुकार) अमोल 📝
२३/०५/२०२०
poetrymazi.blogspot.in

No comments:
Post a Comment