नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, May 10, 2020

चार्जींग उरता उरेना.


मुळ गाणे आणि विडंबन दोन्हींची मजा घ्या

वाट संपता संपेना
कुणी वाटेत भेटेना
कुठे आलो असा कसा
कुणी काहीच सांगेना

[ चार्जींग उरता उरेना
कुणी चार्जर देईना
संपून गेलं असं कसं
हे काहीच समजेना ]

लांब लांब उंच घाट
वाट वाकडीतोकडी
दूर दूर अंधारात
एक दिसते झोपडी
सूर येती अंधारती
कुणी गीतही म्हणेना

[ लांब तिथे कोनाड्यात
वायर खुपच तोकडी
दूर त्या साॅकेटपाशी
 माझी नजर  वाकडी
पोरं येती लावून जाती
कुणी घ्याहो म्हणेना ]

दिसे प्रकाश अंधुक
नभी ता-यांचा कंदील
अंतर दोन मैलांचे
आता गाठीन मंझिल
आकाशात रात्र फुले
चंद्र काहीच ऐकेना

[ होई बॅटरी अंधुक
नसे टाॅवरचा कंदील
अंतर तेही वाढलेले
कशी गाठावी मंझील
पाॅवर बॅक त्यात मिळे
मी कुणाचे ऐकेना ]

वाट संपता संपेना
कुणी वाटेत भेटेना
कुठे आलो असा कसा
कुणी काहीच सांगेना

[ चार्जींग उरता उरेना
कुणी चार्जर देईना
संपून गेलं असं कसं
हे काहीच समजेना ]

📝अमोल
११/०५/२०२०
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...