रविवारची संकष्टी
मंडळी, मोरया 🙏🏻🌺
आज संकष्टी आहे. आध्यात्मिक दृष्ट्या खरं म्हणजे मंगळवारी येणारी संकष्टी म्हणजेच अंगारकी संकष्टी ही महत्वाची असते. असे म्हणतात २१ साधारण संकष्टी केल्याच पुण्य एक 'अंगारकी' केल्याने मिळते. असेल ही पण शास्त्रात जे लिहिलेले नाही पण माझ्या अनुभवाने सांगतो की उपास करणा-याची खरी परीक्षा
'रविवारची संकष्टी' घेते हे नक्की.
एकाग्रतेने तपश्चर्येत मग्न असणा-या तपस्वीचे मनोबल घालवण्यासाठी येणा-या अप्सरेप्रमाणे अनेक प्रलोभने येतात. यात जो निभावून जाईल तोच खरा योगी.
साबुदाणा भिजवला आहेस ना गं! अशी प्रेमळ आठवण बायकोला करुन झोपण्यापूर्वी बॅक आॅफ द माईंड उद्या संकष्टी आहे अशी मनाच्या खोल कोपऱ्यात नोंद ठेवली तरी सकाळी ८ वाजता रंगोली बघताना( ऐकताना), हातात रविवारची पुरवणी चाळताना, समोर चहाचा कप आणि हात चूकून बिस्किटाच्या डब्याकडे जाऊ न देणे म्हणजे तेज गोलंदाजीच्या पहिल्या १० ओव्हरीत खेळपट्टी वर नुसते टिकून राहण्या सारखे अवघड काम.
मुले संकष्टीच्या उपवासात नसल्याने रविवार सकाळची मुलांसाठी बनली जाणारी ' मॅगी ' अगदी २ मिनिटात तुमची विकेट घेऊ शकते. हा एक क्षण पार पाडला की मग दुपारी फराळ झाल्यावर 'बडीशेप' रुपी गुगली तुम्हाला त्रिफळाचित करु शकते.
हे तीन महत्वाचे स्पेल संपल्यावर रविवारचा आराम करुन संध्याकाळी गणपतीला जाऊन रविवारच्या एका दिवशी च्या घरगुती खरेदीसाठी बाहेर पडलात की अगदी फुटपाथवरील पाणी पुरी किंवा नेहमीच्या ठिकाणची भेळ, शेव बटाटा पुरी, वडापाव, सामोसा याचा सुगंध 'रविवारच्या संकष्टी ' दिवशीच आसमंतात जरा जास्तच का भरलेला असतो? हे कोडं मला अजून सुटलेले नाही.
इथेही तुमची विकेट शाबूत राहणे महत्वाचे.
बाकी रविवार असल्याने नेहमीच्या गडबडीत पूजा न करणे, २१ आवर्तन, आणि रात्री उकडीचे मोदक ही 'रविवारच्या संकष्टीची दुसरीही बाजू, जास्त हवीहवीशी वाटणारी
मोरया 🙏🏻🌺 📝
अमोल
१०/५/२०२०
देवा तुझ्या द्वारी आलो
kelkaramol.blogspot.in

No comments:
Post a Comment