आगामी आकर्षण/ लवकरच/ coming soon
पहिल्या भागाला मिळालेल्या उदंड प्रतिसादा नंतर
' नियती प्राॅडक्शन '
घेऊन येत आहे
तुमच्या आमच्या जिवाळ्याचे
'६' अंकी रहस्यमय नाटक
" उत्तरार्ध २०२० " 📝
शुभारंभ १ जुलै ' आषाढी एकादशीच्या ' शुभमुहूर्तावर
पहायला / अनुभवायला विसरु नका ' उत्तरार्ध २०२०
जवळच्या नाट्यगृहात ? नाहीनाही घरोघरी.
😀 मंडळी कशी वाटली जहिरात. अरे जहिरातीचं युग आहे. बिचारी नियती तिला कुठे जहिरात करता येते. म्हणलं आपणच करु ' उत्तरार्ध २०२०' ची जहिरात
मंडळी, आत्तापर्यत आपण सगळेच समजायचो की ६४ कला आहेत. तर ही आपली समजूत आता चुकीची आहे बरं का.
नुकताच एक मराठी सिनेमा येऊन गेलाय. ६६ सदाशिव. बघा मस्त आहे सिनेमा. यात आलेला उल्लेख असा आहे की
६५ वी कला म्हणजे- जहिरात
आणि
६६ वी. - हं याबद्दल परत कधीतरी. कारण हा लेखनाचा स्वतंत्र विषय आहे. आणि जो आमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे.
तर लेखनाचा मथळा, आगामी आकर्षण/ लवकरच/ coming soon
म्हणजेच अगामी गोष्टींची जहिरात. लहानपणी सिनेमाचे पोस्टर किंवा सर्कसीचे पोस्टर आणि त्यावर लवकरच, coming soon वगैरे पाहून छान वाटायचे.
आपण थेटरात सिनेमा बघायला गेल्यावर सुरवातीला किंवा मध्यंतरात एखाद्या नवीन
येणा-या सिनेमाचा ट्रेलर बघायला फार भारी वाटायचे
Coming soon...
आजकाल मात्र नवीन सिनेमा, नवीन मालिका यांच्या पोस्टर पेक्षा त्यांची टीव्हीवरच जहिरात बघायला मिळेल. .
आजकाल सोशल मिडियाने 'अगामी आकर्षणाची' भिंत
ब-यापैकी व्यापलीय हे नक्की.
जहिरात हाच अनेक चॅनेलचा श्वास असतो हे तर तुम्हांला माहितच आहे
मात्र काही काही गोष्टींची coming soon म्हणत नुसती हवा होते . खरं ना ?
नाही कळलं?
पाऊस आहे का तुमच्याकडे 😁
तर मंडळी वरचे सगळे शब्द घेऊन येणारी 'जहिरात' ही नक्कीच एक कला आहे आणि यात अनेक कलाकार आहेत जे आपल्याला 'आनंद' देतात.
न बोलणा-याची 'अमुक किमती' गोष्ट पण विकली जात नाही तर बोलणा-याची 'तमुक कमी किंमतीची ' गोष्टही विकली जाते असे आपण नेहमी म्हणतो
( टिप: ही 'म्हण' मला माहीत आहे, लेखाची लांबी वाढण्यासाठी अस लिहिलय 😌)
तेंव्हा
"कुछ ना कहो, कुछ भी ना कहो"
हे गाणे ६५ व्या कलेसाठी वर्ज्य समजावे.
त्यासाठी
"ढमढम ढोल बाजे, ढोल बाजे ढोल' 🥁 हेच योग्य गाणे
मंडळी, उद्यापासून च्या इंग्रजी कालनिर्णयाचा :उत्तरार्ध २०२० माऊली कृपेने निरोगी जावो या शुभेच्छा 🌺🙏🏻
६५ व्या कलेचा चाहता, ६६ व्या कलेचा उपासक
( कायम ढोल पिटणारा) अमोल
३०/०६/२०२०

No comments:
Post a Comment