आमच्या चेतना वैद्य मॅडमनी हा निरोप पाठवला 👆🏻, त्यांनी खरं म्हणजे 'आव्हान' ( चॅलेंज) न देता 'आवाहन' केलेलं. निरोप बघितल्या बघितल्या त्यांना कळवलं हे व्हिडिओ वगैरे बनवणं काय जमणार नाही मला.
पण मनात हा विषय सुरु झाला. लाॅकडाऊन मधे काय केल आपण ? आणि इतरांना काय सांगशील ? तर त्यांना रोज किमान ' बदाम सात चे' २-४ डाव न चुकता रात्री खेळायला सांगेन
तर मंडळी दिवसभर work from home वगैरे झाल्यावर रात्री आम्ही ५ जण न चुकता थोडावेळ 'बदाम ७' खेळायचो. मी, आई, बायको आणि मुलं
हा खेळ जिवनातील अडचणींशी कसा सामना करायचा हे फार छान सांगतो. ( डिप्रेशन वगैरे कमी होईल का वगैरे फार टेक्निकली मला सांगता येणार नाही)
बघायच कस? खाली आमचे मुलांबरोबरचे संवाद पण लिहिलेत
चला वाटा पत्ते. ५ जण म्हणजे पिसणा-याच्या पुढील दोघांना १-१ पत्ता जास्त.
जीवनात अडचणी सगळ्यांना सारख्या नसतात.कुणाला जास्त कुणाला कमी - १ ली गोष्ट शिकलो.
अरे उचला पानं, वाटलीत बघा. कुणाकडे आलीय बदाम सत्ती ? -
संधी कुणाला आधी मिळते कुणाला नंतर.
चलं खेळ, ताईने सत्ती टाकलीय, तू खेळ. अरे आता मोठ्ठा झालायस, पानं निट लाव बर इस्पिक एकत्र, चौकट एकत्र त्यातही राजा ते एक्का क्रम.
खेळ आधी मग पान लावत बस
- वेगवेगळ्या आव्हानांच वर्गीकरण, त्याक्षणी जे खेळू शकतो ते खेळणे, परिस्थिती चा स्विकार करणे.
बापरे, नुसती चित्रच आलीत माझ्याकडे मी नक्कीच हरणार
- अरे हा डाव हरशील पुढचा जिंकशील त्यात काय? कुठला राजा आहे तुझ्याकडे 'किल्वर' बघ त्याचीच सत्ती पण आहे . दुस-याची अडवणूक करताना तुझेही पान अडकणार, ती आधी खेळून मग इतर पत्ते खेळ
- योग्य नियोजन?
आई- राणी टाक ना माझा राजा सुटेल. अरे हो मला दुसरं खेळायला पानच नाही आहे.
येsssस, सुटला माझा राजा
- जवळच्या माणसांशी चर्चा
माझे टू पेज शुअर मी खेळलो आता वन पेज शुअर, अरे यार तुम्ही सुटलात? काय हे , फक्त एक्का राहिला, माझे १ गुण
- डावाच्या सुरवातीला राजांमुळे ( मोठ्या अडचणी) हरु शकतो असं वाटत असताना त्या किरकोळ एक्क्या मुळे ही हरु शकतो. किरकोळ गोष्टी ही महत्वाच्या असतात
किंवा अगदी लहान सहान गोष्टीत हरलो तर एवढं दु:ख नाही वाटून घ्यायचे. कधीकधी नशीब
दुस-याला आपल्यापेक्षा जास्त देते. बस
चला आता पुढचा डाव कोण वाटणार? - आशावाद?
मंडळी, गेले दोन - अडीच महिने हे नित्य आमच्येकडे. बघा खेळून. तुम्ही पण आज 😊
थोडं विषयांतर. आमच्या टुकार लेखनाचे कायम कौतुक करणारी आमची प्रतिभा मावशी. हिने परवा संजय आवटे यांचा 'जगू या, जिंकू या ' हा लेख पाठवला आणि या विषयावर लिही म्हणाली.
म्हणलं मावशी, मी विडंबनकार. सिरिअस विषय, आणि एवढ छान मला नाही जमणार. तर मावशी ह्या लेखाशीवाय जास्त काही नाही लिहू शकणार.
लेखनाचा मथळा फक्त असा लिहू शकतो 😁
'जगू या, खेळू या
जिंकू या, हरु या पण !
हरण्यात ही कधीकधी मजा असते.
माझ्या लेखनावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवल्याबद्दल या दोघींचे आभार 🙏🏻🙏🏻😊
( खेळाडू) अमोल 📝
१७/०६/२०२०
poetrymazi.blogspot.in

No comments:
Post a Comment