🌞 ग्रह(अ)न - आपण 🪐🌝✨
सृष्टीत ज्या दैनंदिन गोष्टी नित्य नेमाने सुरु आहेत त्यात उद्या घडणारी एक गोष्ट म्हणजे
"सूर्य ग्रहण" . ग्रहणात ही सूर्य आणि चंद्र यांना इतर ग्रहांच्या मानाने जास्त वलय प्राप्त झाले आहे. मंगळ , बुध , गुरु आणि इतर ग्रह ही आपल्या नियमित भ्रमण मार्गात
' ग्रहणांकित '🪐 होत असतातच पण अनेक गाण्यातून कवितेतून वगैरे चंद्राला जरा जास्त वलयांकित केलेले असते, अभिशाप वगैरे तो भोगतो असा उल्लेख केलेला आढळतो. कदाचित ही दोन ग्रहणे आपण सहजासहजी पाहू शकत असल्याने याचीच चर्चा जास्त होत असावी . म्हणूनच की काय पूर्वीपासूनच सूर्य , चंद्र ग्रहणांना इतर ग्रहणापेक्षा धार्मिक दृष्टीकोनातूनही जास्त महत्व दिले गेले आहे.
ग्रहण म्हणजे ? वैज्ञानिक दृष्टीकोनातून अनेक शास्त्रीय लेख तुम्हाला इतरत्र वाचायला मिळतील. पण ' टुकार ' दृष्टीकोनातून फक्त इथेच वाचू शकाल
एखादी गोष्ट व्यवस्थित आहे आणि अचानक त्यात अडचणी यायला लागल्या की त्या गोष्टीला "ग्रहण" लागले असे आपण म्हणतो. सन २०१९ च्या ३१ डिसेंबरला नवीन २०२० चे स्वागत करताना हा विचार ही आपल्या मनात आला नसेल की सगळं व्यवस्थित चालू असणा-या आपल्या नियमित गोष्टींना/ रुटीन कामाला सन २०२० मध्ये मोठे ग्रहण लागणार आहे. आज या २०२० च्या मध्यात आपण आहोत आणि संपूर्ण हे वर्ष आता असेच जाणार हे सांगायला कुणा वैज्ञानिक, शास्त्रज्ञ , डॉक्टर , जोतिषाची गरज नाही.
या शब्दाचा आता दुसरा अर्थ बघू
'ग्रहण - ग्रहण करणे - स्वीकारणे ?????????
सूर्य , चंद्र ( आणि इतर ग्रह ) यांच्या ग्रहणात सूर्य , चंद्र हे राहू-केतू बरोबर युतीत येतात . राहू केतू हे प्रत्यक्षात ग्रह नाहीत तर छेद बिंदू ( nodes ) आहेत. आता आपल्या १२ राशीतून भ्रमण करत असताना राहू , केतू ( पापग्रह ) ज्या राशीत आहेत तिथे सूर्य चंद्र त्यांच्याबरोबर आले की ग्रहण स्थितीत येतात.
काय शिकवतात हे ? जीवनात अधेमधे वाईट गोष्टी/ परिस्थिती तुमच्या वाट्याला येईल ही , पण थोड्या कालावधीसाठी. त्या कालावधीचा स्वीकार करायचा ( ग्रहण), तेवढ्यापुरते 'सबुरी' ने घ्यायचे आणि पुढे जात रहायचे जे सध्या पण सगळेच करत आहोत.
मोठ मोठ्या ग्रहांना हे अनिश्चिततेचे ग्रहण सुटलेले नाही मग आपण कोण एवढे मोठे लागून गेलो आहोत ? चंद्रा सारख्या असंख्य अमावस्यां - पोर्णीमा अनुभवून पुढे जात रहायचे.
चला टुकार लेखनाचा शेवट वसंत बापट यांच्या एका "स्फूर्ती गीताने"
सदा तुझ्यापुढे उभी असे निशा
सदैव काजळी दिसायच्या दिशा
मधून मेघ हे नभास ग्रासती
मधेच या विजा भयाण हासती
दहा दिशातुनि तुफान व्हायचे
सदैव सैनिका पुढेच जायचं
सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे
उद्याच्या योगदिन आणि ग्रहणदिनाच्या शुभेच्छा
🌞🧎🏻
" *योग दिनं ग्रहणाम्यहं* "
( ग्रहांकीत) अमोल ✨💫
poetrymazi.blogspot.com
२०/०६/२०२०

No comments:
Post a Comment