मौज हीच वाटे भारी
खरं आहे. ऋतू बदलला की आमचे शरीर ठेपाळतेच. एक -दोन दिवस आराम केल्याशिवाय शरीराला उभारी येतच नाही
"पडू आजारी, मौज हीच वाटे भारी " हे गाणं आमच्या सारख्या 'कन्सीस्टंटली' आजारी पडणाऱ्या आणि आजार एन्जॉय करणाऱ्या रोग्यांना डोळ्यासमोर ठेऊन 'श्री भानूदासांनी' लिहिले असं मला कायम वाटत राहिलं आहे
पत्रिकेत आमचा लग्नेष ग्रह षष्ठात म्हणजे मुळातच रोग प्रतिकारक शक्ती कमी आमची. भूतलावर अवतरल्या अवतरल्या काही दिवस आमची रवानगी सरळ काचेच्या पेटीत झालेली असं आई सांगते. त्यानंतर दवाखान्यात अॅडमीट व्हायचे प्रसंग म्हणजे शहा डाॅक्टरांच्या दवाखान्यात एकदम ८-१० दुधाचे दात काढले त्यावेळी आणि नंतर डायरेक्ट मोठेपणी नवी मुंबईचे नागरिकत्व मिळण्यासाठी चे प्रमाणपत्र म्हणून एकदा मलेरिया आणि नंतर डेंग्यू झाला त्यावेळी . बाकी गोवर, कांजिण्या वगैरे रोग घरगुती निभावले गेले
पण वरील काही गोष्टी सोडल्या तर आधी उल्लेख केला त्याप्रमाणे ऋतुबदल झाला की आजारी पडणे आम्ही मजेत घेतले 😉
आता या गाण्यातील कुठले ही कडवे घ्या
नकोच जाणे मग शाळेला
काम कुणी सांगेल न मजला
मउ मउ गादी निजावयाला
चैनच सारी
मौज हीच वाटे भारी
या गाण्याची पुढची तिन्ही कडवी अगदी असेच वर्णन करणारी
आता लेख संपवता संपवता शेवटचे कडवे बघू
असले आजारीपण गोड
असून कण्हती का जन मूढ?
हे मजला उकलेना गूढ
म्हणून मी आज माझ मलाच विचारलं, का एवढं आपण मौज केली?
कारण एकच आजतागायत आम्हाला भेटलेले प्रेमळ डाॅक्टर मग ते सांगलीचे डाॅ. शिरगावकर असतील, डाॅ. विजयकुमार शहा असतील, माधवनगरचे आमचे फॅमिली डाॅक्टर कुलकर्णी असतील आणि बेलापूरचे आमचे डाॅ.पडवळ असतील.
प्रत्येक ऋतुतील येणारे आजार आम्ही मौजेने घेतले कारण हे सगळे प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी होते जणू 'माऊली' बनून
आज " डाॅक्टर्स डे" निमित्य त्यांच्याप्रती कृतज्ञता 🙏🏻🙏🏻
इतर सर्व डाॅक्टर मंडळीना शुभेच्छा 💐
अमोल
०१/०७/२०२०
#पडू_आजारी_मौज_हीच_वाटे_भारी

No comments:
Post a Comment