( ALS) *आइस बकेट चॅलेंज* 🥶
गेले दोन महिने पेक्षा जास्त काळ सुरु असलेल्या लाॅकडाऊन मधे सोशल मिडीयावर खूप जणांनी सक्रिय सहभाग नोंदवला. अनेकांनी आपल्या कलाकृती सादर केल्या मग ते गाणे म्हणणे असेल, एखादं वाद्य वाजवणे असेल, स्वयंपाक करणे असेल, चित्रकला, हस्तव्यवसाय अशा काही गोष्टी असतील. किंवा लेखन, काव्य, गप्पा गोष्टी अशा अनेक गोष्टी सोशल मिडीयावर पहायला मिळाल्या. अबालवृध्दांनी सर्वच स्तरावर यात सहभाग नोंदवला.
*अनेक जणांनी तर या अडचणीच्या काळात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून गरजूंना समाजसेवा/ मदत करुन वेगळ्या प्रकारे आपल्यातील कला सादर केली* कामाच्या गडबडीत इतर वेळेला न जमणाऱ्या अशा काही समाज उपयोगी गोष्टी अनेकांनी केल्या.
आज सोशल मीडीया मुळे ही सगळी माहिती सहज समजू शकते. आपण इतरांच कौतुक करुन त्यातुन स्फूर्ती घेऊ शकतो
सोशल मिडीयावर एक थोडा वेगळा प्रकार ही दिसून आला तो म्हणजे आपली कला सादर करुन त्याप्रकाराची कला ( गाणे, कविता, डान्स, पोशाख वगैरे वगैरे) सादर करण्यासाठी दुसरा/ दुसरी किंवा एका पेक्षा अधीक व्यक्तींना आव्हान / चॅलेंज/ नाॅमीनेट करणे. या प्रकारात ही अनेकजण खुप उत्साहात सामील झाले.
थोडंस साखळी विक्री ( चेन मार्केटिंग) सारखा हा प्रकार पण प्रत्यक्षात आर्थिक उलाढाल नाही. तसा 'चेन मार्केटिंग हा लेखनाचा स्वतंत्र विषय आहे, पण तो परत कधीतरी.
मुळ मुद्याकडे परत येऊ. वरील चेन मार्केटिंग मधे काही प्रमाणात आर्थिक गोष्टी आणून आणि सोशल मिडीयाचे 'आव्हान' या गोष्टी एकत्र करुन अमेरिकेत पहिल्यांदा
" आईस बकेट चॅलेच " सुरु झाले
साधारण २०१४ ( किंवा २०१५ असेल ) जुलै / आॅगस्टचा कालावधी असेल
संकल्पना अगदी सरळ होती. एका कर्करोगा संबंधित संस्थेत मदत करायची यादृष्टीने हे कँपेन होते. त्याचे कदाचित नंतर अनेक वेगवेगळ्या समाजोपयोगी गोष्टीत रूपांतर झाले ही असेल
तर एका व्यक्तीने बर्फाच्या तुकड्यांनी भरलेली बादली एका झटक्यात आपल्या डोक्यावर ओतायची ( डोकं शांत ठेवायचा तो अमेरिकी प्रकार असावा) आणि त्या संस्थेला $ १०/- इतकी मदत करायची. हे आव्हान तो स्विकारु शकला नाही तर त्या संस्थेला त्याने $१००/- इतके द्यायचे. त्यानंतर त्याने इतर काही जणांना 'आव्हान ' द्यायचे आणि ही चेन / साखळी पुढे चालू
मस्त कल्पना ना?
म्हणजे खेळ/ थरार/ मजा हे सगळं करता करता 'सामाजिक मदत' हे व्यापक स्वरुप याला दिले गेले. काही कालावधीतच हा प्रकार खूप लोकप्रिय झाला.
आज हे सोशल मिडीयावरील 'आव्हाने' बघून हे सहज आठवले.
बाकी आपल्याकडे लगेच असे करावे असं मला यातून अजिबात सुचवायचे नाहीकारण एकंदर भारतीयांना सामाजिक जाणीव असतेच आणि वेळोवेळी तो तशी आर्थिक मदत करतच असतो.
आणि म्हणूनच गदिमांनी लिहून ठेवलयं
होते तितुके देइ याहुन हट्ट नसे गा माझा,
सौख्य देइ वा दुःख ईश्वरा रंक करि वा राजा
अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि
*देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी*. ||
( सोशल) अमोल 📝
०७/०६/२०२०

No comments:
Post a Comment