सुखाचे हे सुख .......
एव्हांन दोन्ही पालख्या पुण्यात आलेल्या असतात. आषाढ सरीं पेक्षाही, विठू माऊलीच्या गजरात अवघी पुण्य नगरी जास्त चिंब होते . सदाशिव पेठ असू दे , कोथरूड असू दे किंवा बिबवेवाडी, काही ठिकाणी अशा चर्चा रंगतात
बाबा , उद्या शनिवार तुम्हाला मला हडपसरला सोडायचे आहे
का ?
उद्या पालखी 'दिवे घाटातून' जाणार आहे , आणि आम्ही मैत्रिणीनी जायचे ठरवले आहे .
अगं पण तुला जमणार आहे का ?
का , नाही ? आणि नंतर रविवार तर आहे आराम करायला . तुम्ही हडपसरला सोडायचे आणि सासवड च्या जरा आधी फोन करू , मग घ्यायला यायचे
आईला विचारलं ?
हो, ती ' हो ' म्हणलीय.
मग काय, चला ...
"ग्यानबा, तुकाराम, ग्यानबा तुकाराम "
काही राहील नाही ना गं? पाण्याच्या बाटल्या , खायचं ?
छत्री जवळ ठेव , उगाच भिजू नको लगेच सर्दी होते तुला .
होय बाबा , काळजी नका करू
ए हाय ! केंव्हा आलात ?
झाली १० मिनिटे .
अग पण आपली प्रोजेक्ट मॅनेजर कुठाय ' ज्ञानदा ' ?
नेहमी उशीर होतो हिला
ए ती बघ आली !
ए चला हा आता भरभर , उशीर झालाय आपल्याला.
त्या बघ आजीबाई आपल्या पेक्षा किती भरभर चालतायत ते पण तुळशी कट्टा डोक्यावर घेऊन
सेल्फी काढायचा त्याच्यांबरोबर ? का सरळ फेसबुक लाईव्ह करू या
?
नाही हा , फेसबुक लाईव्ह घाटात करू . आत्ता एक सेल्फी काढू फारतर.
अक्षता, त्या आजीबाईंना थांबव ना जरा
' स्माईल प्लिज ' क्लिक
ए ज्ञानदा, उद्या ग्रुपवर छान लेख टाक हं हा फोटो लावून
चला ग किती गप्पा मारताय , खूप लांब जायचंय अजून
ए आपण अभंगांची अंताक्षरी खेळायची ?
हा चालेल
तुलसी, कर चालू
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
क्रोध अभिमान गेला पावतनी
एका एका लागतील पायी रे
------------------------------------------------
राम कृष्ण गोविद , नारायण हरी
केशवा मुरारी पांडुरंगा
लक्ष्मीनिवास पाहे दीनबंधु
तुझा लागो छंदू सदा मज
--------------------------------------------
ज्याचा सखा हरी
त्यावरी विश्व् कृपा करी
---------------------------------
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
रविशशिकला लोपलिया
कस्तुरीमळवट चंदनाची उटी
रुळे माळ कंठी वैजयंती

तारू लागले बंदरी
चंद्रभागेचिये तीरी
लुटा लुटा संतजन
अमूप हे रासी धन
-----------------------------------
नामाचा गजर गर्जे भीमातीर
महिमा सजे थोर तुज एका
------------------------------------------
ए फेसबुक लाईव्ह कर लवकर
ए काय झालं ?
अग बघ ना ? माऊलींची मूर्ती , किती छान ना ?
हो , हो आपल्याला इथेच थाबायचं आहे. पालखी पुढे गेली की मस्त हवेतेवढे फोटो, सेल्फी काढू . बाबा इथेच येतो म्हणालाय घ्यायला आपल्याला
- * -
काय झालं देवा असं गालातल्या गालात हसायला , उठा लवकर .
अग रुख्मिणी , छान स्वप्न पडलेलं , काय मस्त अंताक्षरी खेळत होत्या या मुली वारीत
पांडुरंगा , पांडुरंगा, किती समजवायचं रे तुला , रोज आपली पालखीची स्वप्ने. यंदा लाॅकडाऊन मुळे वारी नाही . चला आवरा भरभर आज आपल्याला ' दिवे घाट' पार करून जायचं आहे .
यंदा परंपरा पाळायला भक्त समर्थ नाही तर भक्तांची परंपरा आपण चालू ठेवायची
*ठरलय ना आपलं ?*🚩🚩
भेटी लागी जीवा .......
अमोल केळकर 📝
२६/०६/२०२०

No comments:
Post a Comment