आई येतो गं
निट जा रे, बाळा. घेतलंस ना सगळं बरोबर
हो आई
आई, खरं सांगू. यंदा खूप दिवसांनी असं वाटतय की यंदा खरा गणेशोत्सव बघायला मिळणार आहे.
धांगड धुडगूस घालत केलेली मिरवणूक नाही, काही ठिकाणी मंडळ ही नाहीत, मोठमोठी उंची नाही, कर्णकर्कश गाणी नाहीत, भक्तीचा बाजार नाही, नवसाची रांग नाही. वेळेत प्राणप्रतिष्ठापना, उरका उरकी नाही, आणि हो आई यंदा पहिल्यांदाच मी अनंत चतुर्दशीला अगदी संध्याकाळ पर्यत गणेशलोकी येईन बर का?
हं, उत्तम
आई, यंदा काही गणेशोत्सव मंडळ १० दिवस 'आरोग्य महोत्सव' साजरा करणार आहेत. समाजाल एकत्र आणून समाजोपयोगी काम करण्यासाठी टिळकांची गणेशोत्सव संकल्पना, अलीकडच्या काळात ब-याच दिवसांनी मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे
पण यासाठी तुझ्या 'नियती' मावशीला मोठ्ठ संकट धाडाव लागलं
आता इथून पुढे सगळे 'भक्त' यातून बोध घेतील, निसर्गाशी प्रामाणिक राहतील अशी 'सुबुध्दी' देऊन ये सगळ्यांना येताना
हो आई
आणि गेल्या गेल्या तुझ्या मित्राला 🐀जिथे जिथे पोहोचाल तिथे तिथे ११ दिवस सक्तीचे विलगीकरण म्हणून बजाव हां
फार फिरत असतो इकडे तिकडे
हो गं आई, चल बाय
#पुनश्च_हरी_ॐ
📝०९/०७/२०२०
poetrymazi.blogspot.in
No comments:
Post a Comment