मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे - 🛣️ एक प्रवास
( 📝मुळ संकल्पना :- शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेले आणि सुनील गावसकर यांनी गायलेले 'हे जीवन म्हणजे क्रिकेटराजा हुकला तो संपला' हे गाणे)
या एक्सप्रेस-वे वर थांबायाला वेळ कोणाला?
हा हायवे म्हणजे वेगाचा राजा, थांबला तो संपला
अफाट अशा हायवे वरती येशी वेळो वेळी
मार्ग मोकळा दिसू लागता, ५ वा गिअर खेळी.
वेग घेई मग मोटरगाडी, फलक मागे फेकी
भवताली तुला मागे धाडाया, जो तो फासे टाकी
मार्गे टपला "टोल-भक्षक" तुझा उधळण्या डाव
फास्ट-टँग बसवशील तर, मिळेल तुजला भाव
चतुर आणि सावध जो जो तोच इथे रमला
हा हायवे म्हणजे वेगाचा राजा, थांबला तो संपला.
( कळंबोली सुटल्यावर सभोवार पहावे तर दिसतात माथेरान, कर्नाळा ची डोंगररांग. मागे पडत जाणारे ट्रक, बस, ट्रेलर,कंटेनर्स .
ओव्हरटेक करुन पुढे जाणारी करकरीत नवीन अँटोमॅटीक गाडी वेगाच्या उन्मादात,धावणारी , पळणारी.
शेजार शेजारच्या दोन अवजड वाहनाच्या टप्प्यात त्यांचा, वेग गळून जातो. स्पिड लिमीट ओलांडल्याच्या जयघोषाच्या जल्लोषातील हवाच सारी निघून जाते.इकडून तिकडे लेन कटिंग करणा-यांना क्षणात आपल्या रांगेत कुणी जागा देत नाहीत....)
असा इथल्या दरबारातील न्याय सदा आगळा
हा हायवे म्हणजे वेगाचा राजा, थांबला तो संपला.
तू चालवत असता लाईट-हाॅर्नचे नारे
या हायवेवरचे नकोच विसरू वारे
फटकार अचूक टर्न, "अमृतां-जनाचा"
वाहतूक असे रे जणू डोंगर थांबायचा
निरंतर राहील तुझी आठवण इथल्या खड्याखड्याला
हा हायवे म्हणजे वेगाचा राजा, थांबला तो संपला.
(चालक 🚗) अ.अ.केळकर
१२/०७/२१
No comments:
Post a Comment