नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, July 8, 2021

आषाढस्य प्रथमदिवसे


 

आषाढस्य प्रथमदिवसे 🌧️

योग जुळला विकेंडचा

कुटुंबासह लोणावळा-खंडाळा 

बेत ठरला मेघांचा...


बायको घरीच असल्याने

कालिदासाने दिली परवानगी

बोर- घाटातूनच वेगवेगळ्या दिशेला

ढगांची झाली रवानगी


कुणी पोहोचले टायगर- पॉईंट

कुणी धबधब्यात मारला सूर

नेहमीपेक्षा जास्त वाहतूक कोंडीने

त्यांच्याही गाड्यातून निघाला धूर


खंडाळा ते नारायणी धाम

भूशी डॅमलाही ढग जमले

 लोणावळ्याचे नेहमीचे वारकरी

लॉकडाऊन मुळे  घरीच बसले


निसर्ग गेला आनंदून

माणसांचा नव्हता त्रास

आषाढस्य प्रथमदिवसे

मेघदूतांची झाली पिकनिक खास


अ.अ.केळकर 📝

🌧️ ०९/०७/२०२१ 

 ज्येष्ठ अमावस्या


#पाऊले_चालती_लोणावळ्याची_वाट

Please Share it! :)

1 comment:

Aishwarya Kokatay said...

नमस्कार, आमच्या येत्या दिवाळी अंकासाठी लेख अगर कथा पाठवता येईल का? अभिप्राय कळवावा. नियमावली ची लिंक खालील प्रमाणे आहे.
https://www.marathicultureandfestivals.com/invitation-diwali-2021?fbclid=IwAR1I5lhlP4KklnVdo0oKWvcETYqqRvC3vVYIxNAXLPX5okstpc1kvk2uqKE

Related Posts Plugin for WordPress, Blogger...