नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, November 30, 2019

सूत्रधार


बातमीचा "सूत्रधार तो" ..
( रविवारची टुकारगिरी 📝)


मंडळी नमस्कार  🙏🏻
'मी परत येईन' नंतर गेले काही दिवस सगळ्यांच्याच ओळखीची एक व्यक्ती प्रसिध्द झालेली होती  ती म्हणजे

बातमीचा "सूत्रधार" तो, इथे निरंतर न्यूज पाडतो

या सूत्रधाराने सांगितलेल्या किती गोपनीय बातम्या प्रत्यक्षात ख-या निघाल्या हा संशोधनाचा विषय होऊ शकतो पण यामुळे गेले काही दिवस वृत्तवाहिन्यांचा टि.आर.पी  वाढण्यास आणि तुमच्या आमच्या सारख्यांचे मनोरंजन होण्यात नक्कीच वाढ झाली हे आम्ही स्वतः या लेखाचे 'सूत्रधार' म्हणून अगदी खात्रीपुर्वक सांगतो 🤓

पण हाच सूत्रधार एकेकाळी अत्यंत विश्वासू असायचा. याचे नियोजन अनेक नाटकांतून दोन अंक जोडताना, भूतकाळात जाताना, कथानक पुढे नेताना, दोन - तीन वेगवेगळ्या घटना एकत्र गुंफताना दिग्दर्शक अगदी खुबीने करायचा.

आठवतीय 'हमलोग' मालिका. प्रत्येक दिवशी मालिका संपली की अशोक कुमार 'सूत्रधार' म्हणून येऊन बोलायचे

एखाद्या कार्यक्रमाचे 'निवेदक' हे 'दिसणारे सूत्रधार' . मात्र असे कार्यक्रम (इव्हेंट मॅनेजमेंट ) पुर्णत्वास नेणारे पडद्यामागचे असंख्य अदृश्य सूत्रधार ही महत्वाचे ठरतात, जे जास्त प्रसिध्द पावत नाहीत.  यात मी "सूत्र शिरोमणी" म्हणून पु.लं च्या 'नारायणाचा' आवर्जून उल्लेख करेन.

 जाता जाता विविध स्नेहसंमेलने, शाळेचे मैत्री मेळावे, कवि संमेलने आणि अशा विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे 'सूत्र' संचलन करणा-या सर्व विभूतींची आठवण यानिमित्ताने करणे आवश्यक वाटते.

आरोपींना आम्ही पकडूच पण त्याच्या ' सूत्रधाराला' ही बेड्या ठोकू असे ही आपण वाचतो आणि नंतर विसरतो.

मंडळी , पण अजून एक सूत्रधार आहे बरं जो आपल्या सगळ्यांना कठपुतली बाहुल्यांन प्रमाणे नाचवत आहे. देव, नियती, प्रारब्ध,  कर्म अशी काही वेगळी नावे ही या सूत्रधारास आहेत

यावेळची "ब्रेकींग न्यूज" ( सगळ्यात मोठी बातमी)

आत्ताच आमच्या अंतर्गत सूत्रांकडून असे सांगण्यात येत आहे की प्रस्तुत ( टुकार) लेखकाने जर सन १९९४- ते - १९९७. रासायनिक अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना " सूत्रांचा" योग्य पद्धतीने अभ्यास केला असता तर आज या लेखकावर असा लेख लिहिण्याची वेळ आली नसती 🤪

तरीपण

जीवनगाणे गातच रहावे, 'सूत्र ' धार ते समजून घ्यावे पुढे पुढे चालावे

 📝( सूत्रधार) अमोल
१/१२/१९
poetrymazi.blogspot.in

Thursday, November 28, 2019

लपंडाव


लपंडाव
( रूपकात्मक,  मनोरंजन हा हेतू)

स्वर्गातील इंद्रप्रस्थ तारांगणात कालनिर्णया प्रमाणे गुरु - चंद्रातील लपंडाव एकदाचा झाला.  एकदाचा झाला असं म्हणण्याचे कारण, काही दिवस स्वर्गलोकातील राजकारण शुल्लक कारणाने ढवळून निघाले होते. त्यामुळे हा कार्यक्रम बघायला कुणी जाईल  की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती.

'सिंहासन' माझेच, मलाच, मीच, असे सतत बोलणा-या देवांचा राजा अर्थात देवेंद्र याला छोटीशी अद्दल घडवायची योजना महा ( शिव) देवाने, ब्रह्मा बरोबर आघाडी करून ठरवली होती. त्यानुसार ब्रह्मदेवाने स्वर्गलोकात "पार्वतीपती" वट लागू केली ज्याने  इंद्रदेवांना आपले 'सिंहासन' सोडावे लागले. २७ नक्षत्रातील प्रत्येकी ४ सदस्य असे १०८ जण असताना केवळ १०५ जणच देवेंद्राबरोबर राहिले आणि राहिलेले ३ घे महा- देवांच्या सांगण्यानुसार अलिप्त राहिले.

याकामात महा-देवांचा जवळचा सहकारी 'नंदी' यांनी देवेंद्र यांना गाफील ठेवण्यात मोठी भूमिका बजावली .

तरिपण गुरु- चंद्राचा लपंडाव कार्यक्रम  'करुनच दाखवू' अशी प्रतिज्ञा इतर देवतांनी घेतल्याने नियोजित कार्यक्रम ठरला.

आता आपल्यातरी काय काम आहे म्हणून 'चंपारण्यातील' गणा सह 'अजीत' समजले जाणारे देवेंद्र कार्यक्रमास उपस्थित राहिले.

शरदाच्या चांदण्यात, सोनियाच्या दिनू या कार्यक्रमाचे आमंत्रण अनेक लोकाचे गण, राजे, देवता, दानव या समस्तांना अगदी ममतेने दिले गेले. क्षणभर विरंगुळा म्हणून सगळे जमले.

आणि तो खेळ सुरु झाला. संध्याकाळच्या वेळी रवीने आपली प्रखरता कमी करुन या खेळात रंग भरायला सुरवात केली. 

एकेकाळचा सर्वश्रेष्ठ , कुणाला न जुमानणारा, खंबीर आवाजाचा, ठाम,  निष्ठावान असा *'गुरु'* मनाचा कारक, मानसिकतेचा कारक, भावनांच्या कारक ग्रहाच्या *चंद्रा* मुळे झोकाळला गेला. अदृश्य झाला

रात्रीच्या पुर्वसंध्येला पश्चिम क्षितीजावर रंगलेल्या या खेळाची मजा सर्वांनी अनुभवली

नियोजित वेळेत गुरु बाहेर आला. तारंगणातील ते दृश्य म्हणजे  अलौकिक होते. द्वितीयेच्या चंद्राची कोर आणि खालच्या बाजूस छोटा गुरु.
यातही देवेंद्राच्या भक्तांना हा शत्रूराष्ट्राचा झेंडा फडकवल्याचा भास झाला आणि त्यांनी तात्काळ निषेध व्यक्त करुन गुरु- चंद्रावर 'स्वर्गलोक-द्रोहाचा' आरोप केला.

काही धार्मिक लोकांना धनप्राप्तीचा उपाय म्हणून द्वितियेचा चंद्र बघितल्यावर हिरवा रंग बघायचे असते हे लगेच लक्षात आले.  तिथे हिरवा रंग दिसला नाही म्हणून त्यांनीही निषेध नोंदवला

कार्यक्रम संपला

पण खरा लपंडाव आता सुरु होईल

अर्थात विष्णूलोकातून भगवान विष्णू आणि नारदमुनी सर्व घडामोडींवर बारिक लक्ष ठेऊन आहेत

📝  २९/११/१९
poetrymazi.blogspot.in

Friday, November 22, 2019

बारा मतीत ..मातीत


( चाल: काळ्या मातीत मातीत, तिफन चालते)

बारा मतीत मतीत, तुफान चालते
तुफान चालते,  तुफान चालते
जन थय थय करते, वाघ डोक बडवितो
डोक बडवितो,वाघ डोक बडवितो 🐯🤦🏼‍♂

मोटा भाई हाकारतो,नंदीबैलाच्या जोडीला
संग पाॅवsर चाले जाते बारा मतीला
संधीवर संधी येती, नाते नकोsते होते
मंत्रीपदाच्या इच्छेने, भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते, वाट वाघाची लागते
वाघ लिला पहातो, कमळी सुखाने नांदते

बारा मतीत मतीत, तुफान चालते
तुफान चालते,  तुफान चालते

🌷⏰✌🏻

✋🏻🏹🤦🏼‍♂

📝 अमोल
२३/११/१९
poetrymazi.blogspot.in

Thursday, November 21, 2019

मी परत लिहीन, मी परत लिहीन


' मी परत येईन ' ( एक अराजकीय स्फुटक) 📝

मंडळी नमस्कार 🙏🏻

गेले काही दिवस महाराष्ट्रातील एकंदर सामाजिक स्वास्थ्य ज्या एका वाक्याभोवती फिरत आहे ते वाक्य म्हणजे

मी परत येईन, मी परत येईन, मी परत येईन

हे राजकीय घडामोडी संबंधित वाक्य आहे. पण या वाक्याचा संदर्भ घेऊन काही नेहमीच्या जिवनात नकळत आपण हे वाक्य ( अगदी असंच नव्हे)  कसे वापरतो ते पाहू

मला वाटते याचे बाळकडू आपल्याला अगदी घरातच मिळालेले असते. काही कामानिमित्त आपण बाहेर,दुस-या गावी निघालो आणि 'निघतोय मी', 'जातोय मी ' असं म्हणलं गेलं तर वडिलधा-यांकडून लगेच आदेश येतो  ' मी येतो ' असे म्हणं ( मी परत येतोय)

दुसरे एक वक्री उदाहरण द्यायचे झाल्यास शाळेत मास्तरांकडून दिला जाणारा 'घरचा अभ्यास'/ सुट्टीतील अभ्यास.
 इथे महत्वाचे म्हणजे तुम्हाला जरी  इच्छा नसली तरी तमाम मास्तरांना ( गुरुजी शब्द मला घरचा अभ्यास देणाऱ्यांसाठी वापरायला आवडत नाही , ते मास्तरच 😏) तुम्ही परत येणार आहात याची खात्री असते आणि म्हणूनच ते तुम्हाला घरचा अभ्यास देतात.

टेलिव्हिजनच्या दररोजच्या रटाळ मालिका ही नकळत 'मी परत येईन' असंच सुचवत नाहीत का?
पूर्वी काही खास कार्यक्रम उदा. रंगोली, सुरभी, साप्ताहिकी इ.इ. 'केंव्हा परत येतील' असे वाटायचे.

सिनेमाचा एक भाग पुर्ण करुन ( सिनेमा चाललाच तर) पुढील अनेक भागांची  जुळणी करुन ठेवणे हा ही मला ' मी परत येईन ' चाच भाग वाटतो.

२४ * ७ मनोरंजनात कुठेही कमी न पडणा-या वृत्तवाहिन्या, भेटूया एका विश्रांती नंतर असं जेंव्हा म्हणतात तेंव्हा पुढचे 'मी परत येईन' हे शब्द मला सायलेंट ( अनुच्चारित)  वाटतात.

कबड्डीत आऊट झालेला खेळाडू,  कसोटी सामन्यात पहिला डाव झाल्यानंतर दुस-या डाव खेळण्यासाठी आतूर असणारा खेळाडू,  काही कारणाने संघाच्या बाहेर राहिलेला खेळाडू यांच्या मनात 'मी परत येईन ' असा सुप्त विचार नक्कीच असेल ना?

भांडण झाल्यावर वडीलधारी मंडळी भांडण तात्पुरते सोडवतात त्यावेळी भांडलेल्या व्यक्तींच्या मनातील भाव, आत्ता सोडतोय पण थांब बघतोच तूला😠 ( मी परत येईन)  असाच दिसतो ना?
( Whatsapp वरील वैचारिक कुस्तीत ही हे दिसून येते.  आत्ता उत्तर द्यायला वेळ नाही मला,  मी परत येईन, परत भांडेन )

काही थोडक्यात उदाहरणे,  घरात लग्न कार्य असते काही १-२ गाड्याच असतात त्यावेळी वाहन चालक सांगतो, थांबा तुम्ही इथे, यांना सोडून तुम्हाला घ्यायला 'मी परत येईन ' .

शाळेतील ब-याच दिवसांनी भेटलेली मित्र -मंडळी परत नक्की भेटायचं हा ..! यंदा लोणावळा बरं का !असे ठरवतात तेंव्हा एका प्रकारे ' मी परत येईन ' असेच ना?🤗

अशा अनेक गोष्टी घडत असतात. अगदी दर ३० वर्षांनी शनी महाराज ही न चुकता तुमच्या राशीला १२ वे येतात. जणू ३० वर्षापूर्वी साडेसाती संपल्याच्या आनंदात ' मी परत येईन ' हे त्यांचे वाक्य आपणास ऐकू गेलेले नसते.

अडचणीत सापडल्यावर देव आठवतो. नवस केले जातात आणि ते करताना माझे अमुक तमुक काम झाले तर मी येऊन नवस फेडेन ( म्हणजेच मी परत येईन)  अशी लाच ही दिली जाते.

मंडळी , लेख आवरता घेतो. तुम्हाला आवडला, नाही आवडला,अवश्य प्रतिक्रिया द्या.टिका सुचनांचे स्वागतच.

तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनावर
मी पुन्हा लिहीन, मी पुन्हा लिहीन, मी पुन्हा लिहीन 🙏🏻😌

अवांतर:-
मी परत येईन - असे न म्हणणाऱ्यांसाठी

लहान मुले ( अगदी पक्षांचीही) एकदा बाहेर गेली खेळायला, की परत यायचे नाव काढत नाहीत. मग त्यांची अशी समजुत काढावी लागते

या चिमण्यांनो परत फिरा रे. ..

📝 अमोल
poetrymazi.blogspot.com
२२/११/१९

Wednesday, November 20, 2019

महा राष्ट्राs ची घडी परत लागू दे


मुळ गाणे: जीवनात ही घडी अशीच राहू दे

मुळ विडंबन: शांता लागू, पणजी
 ईश्वराची ही कृपा अशीच राहू दे, येणारी नवी सखू नीट नांदू दे

विडंबनाचे विडंबन अर्थात
आमचा राजकीय झब्बू 😬 🃏
( निव्वळ मनोरंजनासाठी )

हे देवेंद्रा,

महा राष्ट्राs ची घडी
परत लागू दे
येणारी वसंत-सेना
सुखाने भांडू दे

काल गेली पाहुनिया 'वर्षा' बंगला
तो(च) बदला काढितसे मस्त चांगला🌷
बहुमताच्या आकड्याची
हौस भागू दे ।

महा राष्ट्राs ची घडी
परत लागू दे

'शहा'ण्यास वठणीवरी तीच आणू दे
'मी परत येई न ' चे 'वाक्य स्मरु दे
आयत्या बिळा वरीच 🐍
रोटी लाभू दे ।✋🏻

महा राष्ट्राs ची घडी
परत लागू दे

मुंबईत येतील गं खूप पाहुणे
मौजमजा खानपान फक्त बोलणे
अतिथींची सरबराई
दहात होऊ दे 😋

महा राष्ट्राs ची घडी
परत लागू दे

दुस-या पार्टीत जाण्या सोस आगळा
लढुनिया हरतो मी, आज मोकळा
थकुनिया येता मम
"नमो " म्हणू दे 🙏🏻

म्हाडाची लाॅटरी हवी, सिडकोचे काम
सामन्यातून शिकवू आम्ही साम,दंड,धाम
इटलीच माझ्यावरी
पाळत ठेवू दे ...! 🧐

महा राष्ट्राs ची घडी
परत लागू दे
येणारी वसंत-सेना
सुखाने भांडू दे

📝 २१/११/१९

Saturday, November 16, 2019

जरा युतीचे, जरा आघाडीवर बोलू काही


संदीप ची ( खरंच) माफी मागून

जरा युतीचे, जरा आघाडीवर बोलू काही
चला दोस्त हो भविष्यावर बोलू काही

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाहीत मंत्री तोवर बोलू काही
चला दोस्त हो भविष्यावर बोलू काही

'सामना' पाहून टिव्हीवर कुरकुरला पो-या
मिटले नाहीत 'वाद' तोवर बोलू काही
चला दोस्त हो भविष्यावर बोलू काही

हवेहवेसे मंत्रीपद जर हवेच आहे
नकोनकोसे गुप्त संभाषण बोलू काही
चला दोस्त हो भविष्यावर बोलू काही

उद्या उद्याची किती काळजी मंत्रालयातून
सत्ता आहे विरोधा नंतर बोलू काही
चला दोस्त हो भविष्यावर बोलू काही

(अ)पक्ष असू दे हाता मध्ये काठी म्हणूनी
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही
चला दोस्त हो भविष्यावर बोलू काही

जरा युतीचे, जरा आघाडीवर बोलू काही
चला दोस्त हो भविष्यावर बोलू काही

📝१६/११/१९

Tuesday, November 12, 2019

ब्लँक काॅल


*संदीप खरेंची* एक खूप छान कविता
 'ब्लँक काॅल '  सध्दयाच्या
 *राजकीय पार्श्वभूमीवर* थोडी बदलून 📝😌
------------------------------------------
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही कुणी *समानते* वाणी
*पदा* एवजी रहातं फक्त डोळ्यामधे पाणी

कळताच मलाही मग थोडंस काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
*युतीच्या वाटेतून* शांतता वहाते
खूप खूष वाटून अजून काही सांगते

पूर नि शेतं नि वा-याची गिरकी
निसर्गाने सा-यांची घेतलेली फिरकी
*कमळीवर* काढलेली *बाणाची* चित्रं
" *तुझ्यापुढे मी खोडलेला मित्र*"

*पत्रकार परिषदा* रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून *शहा* ण्यासारखे वाग
*कमवायचे* ढीगभर लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून

*पार्कातले* झाड आणि *मातोश्रीचा* पार
थंडीमधे *मुंबईत* उन्हाची धार
काॅफी घेऊन *नागपूरला* बोलायचे कडू
*भाषणात* पहायचे येते का रडू

माणूस आहेस "गलत" पण मागतोस "सही"
पावसात भिजलेले *नेते*  व ही
पुन्हा नीट नव्याने लिहित का नाहीस?
काय. ..  रे *वेळेवर* आठवतय का नाही?
शब्दसुध्दा नाही तरी कळे असे काही
हातामधला *हात* सुध्दा इतकं बोलत नाही

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठी खोल दुखलेलं रक्त
*वेळजाते* निघून थरथरतो *हात*
*राष्ट्रपती राजवटीची क्षणांवर मात*

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण

📝 अमोल
१३/११/१९
poetrymazi.blogspot.in

Wednesday, November 6, 2019

पाळणा हलला, पाळणा हलला


ज्ञानेश्वर माऊलींची माफी मागून मातोश्री चरणी अर्पण 🙏🏻

( चाल : *मोगरा फुलला*)
हेतू: अर्थातच येणारी *गोड बातमी* (मनोरंजन)
🏹🌷

पाळणा हलला, पाळणा हलला
सत्ता बघता जवळी कमळीचा झाला

इवलेसे पोर जिंकियले द्वारी
त्याचा वेलु गेला वर्षाsवरी
पाळणा हलला, पाळणा हलला
सत्ता बघता जवळी कमळीचा झाला

आकड्यांच्या गुंती,मनगुटीवर शेला
बाप बारामतीवरी मातोश्री अडला.

पाळणा हलला, पाळणा हलला
सत्ता बघता जवळी कमळीचा झाला

📝७/११/१९
#गोड बातमी लवकरच

Monday, November 4, 2019

युती आघाडी , मौज त्यांना वाटे भारी


🏹🌷 खेळ मांडला ✋🏻⏰

मुळ गाणे : पडू आजारी, मौज हीच वाटे भारी
( विडंबन हेतू: निव्वळ मनोरंजन)

युती आघाडी , मौज त्यांना वाटे भारी

टांगत ठेवणे मग सत्येला
मुख्य - मंत्री यांचाच नटला
म्याॅऊ, म्याॅऊ प्राणी गुरगुरायला
चैनच सारी॥ मौज हीच ठरणार भारी

मिळेल थाळी, दहाला अण्णा
पाच घेऊन आला श हाणा
संत्री, साखर, लिंबू आणा
जा बाजारी! मौज आमची होणार भारी

भवती रिपोर्टरचा मेळा
दंगा थोडा जरी कुणी केला
मी कावुनी सांगेन तयाला
जा बाहेरी 👉🏼
मुख्य मंत्री आमचाच भारी

आमची 'आघाडी' पण गोड
अजून कण्हती का नेते शूर?😉
कशाला गोष्टी आजी - माजी
म्हणून विचारी !!

संधी हिच वाटे भारी ✌🏻

युती आघाडी , मौज त्यांना वाटे भारी

📝५/११/१९
poetrymazi.blogspot.in

Monday, October 28, 2019

दादा मला एक साडी आण


'चंपा'रण्यातील भाऊबीज गीत
( प्रसंग: कोथरुड मधे साडी वाटप
हेतू : निव्वळ मनोरंजन हाच हेतू)

नवी नवी पान , कमळीची छान
दादा मला एक साडी आण

नव्या नव्या आमदाराची चंद्रकांती साडी
चंद्रकांती साडीवर रस्त्यावरची खडी
'पंचरंगी' पदराला कोल्हापूरी वाण

दादा मला एक साडी आण

साडीला आणायला 'कुल कुल' गाडी
'कुल कुल' गाडीला रेनकोटची जोडी
भिजणारी गाडी फुलवी कोथरुड चे रान

दादा मला एक साडी आण

साडीशी गट्टी होता तुला फक्त टाटा
तुला आता टाटा (यु)तीला सत्येत वाटा
पुराच्या पाण्याने, गेली खाली मान

दादा मला एक साडी आण

📝२९/१०/१९🌷
#साडी बूला रही है

Wednesday, October 23, 2019

आली माझ्या घरी ही दिवाळी


उठा उठा दिवाळी आली..💥

फक्त पाऊस घेऊन आली ☔
आली माझ्या घरी ही दिवाळी

चक्री वादळ कमी दाब हा,मी तर त्यात अडकावे
रोज भिजूनी तुझ्यासंगती आजारी मी पडावे
रेन कोट असे, हाती छत्री वसे
वीज आकाशी खुलते भाळी

आली माझ्या घरी ही दिवाळी 💥

पाऊल पडता घरा बाहेरा, डुबकन बुडुन गेले
स्कुटी काढिता रस्ती देवा, ढग बरसत आले
पाणी साचे दारी, लाट येई घरी
गडगड करीत झाली भूपाळी

आली माझ्या घरी ही दिवाळी 💥

बेडकांचे वाहन घेऊनी वर्षा अंगणी आली
दीप लावूया घरात आता अशी ही दिपावली
थंडी नाही खरी, जाहले बावरी
अशी ही रचना निराळी

आली माझ्या घरी ही दिवाळी 💥
📝 poetrymazi.blogspot.in

https://youtu.be/oPIMAnIdq2s

Friday, October 18, 2019

आज पावसात सभा जाहली जरी



विधानसभा निवडणुकीच्या सभेचा सर्वत्र पाऊस पडत असताना खरोखरचा पाऊस आला आणि .... ☔☔🎤

चाल: आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी

(टिप:  मनोरंजन हा हेतू .. )

आज पावसात सभा जाहली जरी
नेत्यांना जरा वेळीच पाठवा घरी

तोच तोच नेताथोर 'वेळ; दावतो ⏱
हात काढुनी खुशाल रंग टाकतो ✋🏻
हरवुनी, जिकूंनी सर्वाना फसवतो
सांगतो अजूनही तुला परोपरी

नेत्यांना जरा वेळीच पाठवा घरी

सांग ' गुलाबी ' फुलास काय जाहले 🌷
चिन्ह घेतल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास 'ईडे ईडे'  रंग लागले
एकटाच वाचशील काय तू तरी 🏹

नेत्यांना जरा वेळीच पाठवा घरी

त्या तिथे विधानसभेचा खेळ रंगला 🤼‍♂
कार्यकर्त्यांसवेत पुढारी दंगला 🤺
तो पहा 'विरोध' भाषणात गाजला 🚂
हाय भाजली फिरून तीच भाकरी

नेत्यांना जरा वेळीच पाठवा घरी


📝अमोल केळकर
१९/१०/१९
poetrymazi.blogspot.in

*२१ ला मतदान अवश्य करा* 👆🏻

Friday, October 11, 2019

सांग,ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू ?


सांग,ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू ?
✨✨⭐
तू काय सांगणार ? " आमचं  ठरलंय "  आधीच

राजकारणी झालास की

मान्य , नुकताच राजकारणात  प्रसिद्ध झालेला  हा शब्द " आमचं  ठरलंय ". पण राजकारण म्हणजे सगळंच वाईट नसतं ना ? मग त्यातली  चांगली संकल्पना घेतली तर बिघडलं कुठं ?

तर त्या कोजागिरीच्या चांदण्याच आणि आमचं असं ठरलय की  या अश्विनी पोर्णीमेच्या शुभ्र प्रकाशात या वसुंधरेला जसं  हे चादणं  न्हाहू घालते  तसेच  या  वसुंधरेच्या  लेकरांच्या मनात ही लख्ख प्रकाश पाडायचा . मनातील क्लेश, द्वेष , राग या भावनांची जळमटं  दूर करायची

हे  ' आमचं' ठरलय' . नीट वाच . माझं नाही. कारण "आमचं" या शब्दात माझं या  शब्दा पेक्षा जास्त  शक्ती आहे.

हा पण तू म्हणतोय त्याला पुरावा ?

हे काय विचारणं झालं ? " चादण्यांचा गंध जेव्हा , पोर्णीमेच्या रात्रीला " येतो  तेव्हा कायमच ' चंद्र आहे साक्षीला , चंद्र आहे साक्षीला

आणखी पुरावा पाहिजे असेल तर तो " शुक्र तारा दिसतोय ? " त्याला विचार  तो ही सांगेल " चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद  या गाण्यातूनी "

हो रे  चंद्र हा खरा जादूगार ; प्रतिपदेपासून पौर्णिमे पर्यत वेगवेगळी जादू या नभांगणात दाखवतो आणि जेव्हा " हात तुझा हातात अन धूंद ही हवा , रोजचाच चंद्र आज भासतो नवा" .

ओ हो , क्या बात है  " हसले मनी चांदणे , जपून टाक पाऊल साजणी , नांदतील पैंजणे"

बरं हा! ,  मग  " चांदण्यात फिरताना माझा धरलास हात , संख्या रे आवर ही सावर  ही चांदरात "

अगं, एवढ्यात कुठं आवर ? तरुण आहे रात्र अजुनी

हे कुठलं गाणं?  मी तर सध्या  'वरूण  आहे मात्र अजुनी '  हेच ऐकतेय

हा तुझी काय चूक म्हणा , या विडंबनकाराचा इतका सुळसुळाट झालाय की  मूळ गाणे ' तरुण आहे रात्र अजुनी ' असं सांगावं लागतंय
पण सांगू ? मला काय वाटते ते निवडणूक करूनच जाऊ , दिवाळी करूनच जाऊ असं जे पाऊस म्हणतोय ना ते खोटं  आहे . मला वाटतंय त्याला यंदा ' कोजागिरी ' कशी साजरी करतात हे बघायचे असेल.

पण मग आता रे ?

मगाशी सांगितलं ना "आमचं ठरलंय"

परत तेच

अगं, चंद्राच्या त्या  मैत्रिणी आहेत ना त्यांना सांगितलय, यंदा चादणं  ढगाआड राहीलं  आणि " कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर " अशी अवस्था झाली तर  यंदा  दिवाळीत आपण सगळ्यांनी   ' चांदणी ' चा आकाशदिवा लावून सारं तारांगण गावा गावातून उतरवायचं

तेव्हा  ठरलय आता

*नवीन आज चंद्रमा , नवीन आज यामिनी*
*मनी नवीन भावना , नवेच स्वप्न लोचनी*

आगामी कोजागिरीच्या सर्वाना शुभेच्छा 
🙏🏻💐🌝

📝अमोल
poetrymazi.blogspot.in

Wednesday, October 9, 2019

वरुण आहे मात्र अजुनी


*या वर्षीचे कोजागिरी गीत.......*

*वरुण आहे मात्र अजुनी*
*राजसा भिजलास काssssरेssss?*
💦🌨🌧

एवढ्यातच त्या ढगांवर तू असा रुसलास का रे?
*वरुण आहे मात्र अजुनी*

अजुनही दिसतात भोवती, वाहनांच्या दिपमाला
अजुन मी पोचले कुठे रे,सांग तू पोचलास का रे?

सांग या *'चंपा'रण्यातील*, चांदण्याला काय सांगू
ढकलते कार माझी, पण तू सूटलास का रे?

*वरुण आहे मात्र अजुनी*

बघ तुला लागतोच आहे, सिंहगडचा गार वारा
रेनकोटच्या प्लॅस्टिकचा, गंध तू लुटलास का रे?

*वरुण आहे मात्र अजुनी*

उसळती गल्लीत माझ्या, मुळामुठाच्या धुंद लाटा
तू घरातचबसून आज, कोरडा राहिलास का रे?

*वरुण आहे मात्र अजुनी*
*राजसा भिजलास काssssरेssss?*
💦🌨🌧

( पहिल्या दोन ओळींची भेट देणाऱ्या अनामिक कवीस समर्पित 🙏🏻😃)

📝 अमोल
१०/१०/१९
poetrymazi.blogspot.in

लींबू टायरच्या मध्ये , राफेल उभा आहे भाई


या व्यंगचित्रावर सुचले. व्यंगचित्र जसे मनोरंजनासाठी तसे हे काव्य ही निव्वळ मनोरंजन म्हणून घ्यावे .
चाल : लिबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई

लींबू टायरच्या मध्ये , राफेल उभा  आहे भाई
आज माझ्या "पडोसीला "  झोप का ग येत नाही

फुलं ठेवली डोक्यात, दस-याला झाली घाई
फ्रान्समध्ये विमानाच्या स्वागताला मंत्री जाई
"हॉर्न ओके प्लिज"  ची ही, लाव नीट काळी शाई

आज माझ्या "पडोसीला "  झोप का ग येत नाही

देवस्की न से हे बाळा , शब्द ओंकाराचे भाळी
तुझी झेप पाहण्यासाठी, नाही नियमांची होळी
जगावेगळी ही ममता , जगावेगळी पुण्याई

आज माझ्या "पडोसीला "  झोप का ग येत नाही

📝०९/१०/१९
poetrymazi.blogspot.in
🚀

Monday, October 7, 2019

अशी विडंबन येती, आणिक मजा देऊनी जाती


*अशी विडंबन येती, आणिक मजा देऊनी जाती*

मंडळी नमस्कार 🙏🏻

एखादा विषय घेऊन त्यावर गप्पा गोष्टी करायच्या या मालिकेतील पुढचा विषय 'विडंबन साहित्य '

खरं म्हणजे विजयादशमी / दस-याच्या आधी कशाला हा विषय? त्यापेक्षा धुळवडीला चालला असता हा विषय. आपट्याची पाने देऊन सोनं घ्या सोन्यासारखे रहा असं म्हणायचे हे दिवस. नंतर नाही का लिहिता येणार?

नाही, म्हणणं  बरोबरच आहे तुमचं.

होळी/धुळवड म्हणजे त्या दिवशी हास्य कवी संमेलने/ विडंबन काव्य हक्काने सादर करण्याचा दिवस. मात्र इतर वेळेला या साहित्य प्रकाराला फारसे जवळ केले जात नाही. त्यात ही दसरा/ पाडवा/ दिवाळी पहाट हे तर अगदी खास दिवस. यादिवशी असे साहित्य मुळीच नको. अशा विचाराने की काय हा साहित्य प्रकार फारसा लोकप्रिय होताना दिसत नाही.

चला थोडं बालपणीत जाऊ..

अगदी साहित्य कशाशी खातात हे माहीत नसताना म्हणजेच आपण अगदी लहान असताना आपल्या सगळ्यांनी  एक वाक्य हमखास आपल्या मित्राला नक्की म्हणायला लावले असणार.

आपण मित्रास: पाडवा म्हण पाडवा
मित्र : पाडवा
आपण : नीट बोल गाढवा 🤣

आणि मग सगळे हास्यकल्लोळात सामिल. मग तो मित्र इतरांची फिरकी घ्यायला पुढे
( आजच्या Whatsapp फाॅर्वर्ड च मूळ,  माझ्यामते तिथे आहे 😉)

तर विडंबनाचे बीज अशा पद्धतीने प्रत्येकाच्यातच लहानपणी असते पण पुढे पुढे जास्त कळायला लागेपर्यत एक तर नकळत ते उखडले गेलेले असते किंवा त्याचे बोन्साय झालेले असते. मग लहानपणीची निख्खळ मजा घेणारे आपण  मोठं झाल्यावर मात्र मजा घेऊ शकत नाही. काय बरं असावीत याची कारणे?

माझ्यामते विडंबन साहित्य हे मुख्यत्वेकरून
१) प्रासंगिक असते.  तो घडलेला प्रसंग लक्षात नाही आला तर विडंबनाची मजा घेता येत नाही.
२) काही वेळेला विडंबन ज्या मूळ गाण्यावर/ कवितेवर/ गझलेवर असतं ते मूळ काव्य माहित नसते.
३) 'विसंगती पकडणे' हा विडंबनाचा मुख्य गाभा असतो आणि राजकारणी सगळ्यात जास्त विसंगती करण्यात माहिर असतात. त्यामुळे विडंबनासाठी हा हक्काचा कच्चा माल असल्याने यावर सगळेच विडंबनकार तुटून पडतात. पण सृजन साहित्य प्रेमी राजकारण विषय नको या भूमिकेत असल्याने हे विडंबन साहित्य फारसे रुचिने वाचले जात नाही किंवा कळत नाही.
४) सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजकारणात विषयातही ही तुम्ही त्यांचेच विडंबन करता विरोधी/ इतर पक्षाचे करत नाही असा आरोप होतो.

अहो जो कामच करत नाही त्यांचे कसले विडंबन?  😁

जे काम करतात, त्यांचीच विसंगती दिसून येते मग त्यांच्यावरच विडंबन येणार ना? 🙂

हे मुद्दे काही वेळा दुर्लक्षित होतात आणि हा साहित्य प्रकार फारसा आवडला जात नाही.
५) मनोरंजन या हेतूने न बघता काहीजण विडंबन वय्यक्तिक घेतात आणि मग विडंबनकाराना टिकेला सामोरे जावे लागते
( अगदी आचार्य अत्रें पासून केळकरां पर्यत कुणीही यातून सुटलेले नाही 😬 )

तर अशी ही विडंबनाची गाथा.  प्रसंग लक्षात आला तर मात्र नक्की करमणूक होते.✔✔

 अगदी घरात या भिंतीवरुन त्या भिंतीवर जाणारी ' पाल ' - *ही पाल तुरूतुरू चढती भिंतीवरती हळू* ( मुळ गाणे: ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु) अशा विडंबन काव्यातून पळायला लागते. 🦎

बायको माहेरी गेली की मग *तव्यावर केली मी बुर्जी बहाल, कसा आलाय रंग लाल जहाल* असं म्हणावं लागतं

अशा प्रासंगीक गोष्टीतून. विडंबनाचे  ' हे वेड मजला लागले' ( *हेल्मेट आज मी घातले'*)   ते इतकं की अगदी *वडा-पाव खाता खाता*( उष:काल होता होता) ही सहज विषय सुचू लागले. रस्त्यात रहदारीत अडकून ही मग  *'मी ओळखून आहे सारी तुझी वहाने*( मी ओळखून आहे,  सारे तुझे बहाने)

असा हा विडंबनाचा खेळ व्हाटसप वर रंगत गेला ' *खेळ मांडियेला व्हाटसप वरती बाई*( खेळ मांडियेला वाळवंटी बाई)  . हा खेळ आता इतका रंगात आलाय की *काय टाकिले व्हाटसपवरती*( काय वाढिले पानावरती)  याची उत्सुकता अनेकांना राहू लागली आणि मग *'रचिले अॅडमिनमुनींनी त्यांचे ग्रुप अनंत* ( रचील्या ऋषीमुनींनी त्यांच्या ऋचा अनंत)

हे सर्व शक्य झाले ते केवळ प्रासंगिक *'न्यूज पाहून सुचले सारे, टुकारच्या पलिकडले*( शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले)

चला खुप झालं वाचून,भूक लागली असेल तर *लाह्या लाह्या अखंड खाऊ या*( धागा धागा अखंड विणू या)  आणी म्हणू या *हाॅटेलचा हा तूला दंडवत* ( अखेरचा हा तूला दंडवत)  🙏🏻

📝🖊✏✒🖌
खंडे नवमी 🌷🙏🏻
७/१०/१९
poetrymazi.blogspot.in

Sunday, October 6, 2019

लोकल माझी लाडाची लाडाची गं


*लोकल माझी लाडाची लाडाची हो*🚆

प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे.

१) ८:२१ ची ठाणे लोकल आज रद्द करण्यात आली आहे.
२) बदलापूरला जाणारी जलद लोकल आज फलाट नं ५ एवजी फलाट नं २ वर येत आहे
३) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ला जाणारी ही लोकल आज १२ डब्यां एवजी ९ डब्यांची चालवण्यात येत आहे.
४) काही अभियांत्रिकी कामानिमित्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी सकाळी १० ते संध्याकाळी ४ मेगा ब्लाॅक घेण्यात येत आहे

प्रवाशांना होणाऱ्या गैरसोईबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

यात्रीगण को हो ने वाले असुविधाके लिये हमे खेद है

👆🏻 मुंबइतील लोकल प्रवास माहित नसणाऱ्याला हे  सगळं कदाचित नवीन वाटेल पण रोज लोकने प्रवास करणाऱ्यांना हे काही नवीन नाही. पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर यानुसार फक्त संदर्भ काही ठिकाणी बदलतील पण प्रत्येकाच्या वाट्याला येणा-या अडचणी अगदी सारख्या

स्टेशन बाहेरची गर्दी, तिकीट/ पास काढायची गर्दी.  बंद पडलेल्या मशीन मधून कार्डावर तिकीट कसे मिळवायचे हा पडलेला प्रश्ण. आपली नेहमीची लोकल आज किती मिनीटे लेट याची धाकधूक,  फेरीवाले, बुट पाॅलिश वाले, खाद्य पदार्थाचे स्टाॅल. चलो भाई दादर उतरना है क्या म्हणून पुढच्याशी केलेली चौकशी. आणि असाच परतीचा प्रवास. वर्षातील ५२ रविवार ( नशिबवान लोकांना तेवढेच शनिवार किंवा निम्मे शनिवार), ५-६ सुट्ट्या,  रजा वजा करता इतर सर्व दिवशी  या नखरेल लोकलचा प्रताप सर्व मुंबईकर अनुभवतोच.

रोज मरे ( मध्य रेल्वे ) त्याला कोण रडे? अशी परिस्थिती

एखादा/ एखादी गोष्ट मुद्दाम करत असेल तर आपण २-४ वेळेला प्रेमाने सांगू. ऐकतच नाही म्हणल्यावर? सोडून देऊ

हो ना?  अशांबद्दल द्वेश अजिबात नाही. किंबहुना अगदी सगळं विसरुन एक दिवस प्रेमाने त्याच्याशी / तिच्याशी बोललं तर?
नाही सुधारणार  हे माहित आहे तरीही.

असा एक दिवस दरवर्षी मुंबईकर साजरा करतात. तो दिवस उद्या येतोय. खंडेनवमीचा

एरवी या आपल्या राणीवर ( मग ती बेलापूर, बदलापूर, कर्जत, खोपोलीची असू दे किंवा टिटवाळा,  बोरिवली,  अंधेरीची असू दे) मुंबईकर कितीही रागावू दे. उद्या एक दिवस मात्र हक्काने तिचे लाड करणार.
खंडेनवमीच्या आदल्या रात्री मुक्कामाला कार्ड शेडला गाडी आली ( शक्यतो ही गाडीही क्वचित बदललेली असते) की रात्रीतच सजावटीला सुरूवात होते. प्रत्येक डब्यात पताका,  मोटरमन केबीन, गार्ड केबीन ला झेंडूची फुले, आंब्याची पाने, केळीचे/ उसाचे, खांब, पुढे मोठ्ठा फलक. डब्याच्या प्रवेशद्वारावर शुभेच्छांचे प्रिंट आऊट, वर्गणी,  पूजा, आणि लोकल इतकाच सर्वांच्या आवडीचा प्रसाद
'वडा-पाव ' याने कार्यक्रमाची सांगता.

*ही तर निर्जीव गाडी.  तिच्यावर आपण एकदिवस का होईना मनापासून प्रेम करतो मग हेच कुणी कितीही वाईट वागलेला सजीव असू दे. आपल्याला असे वागता येणार नाही का?*

बरं का मंडळी, हे ही मुंबई स्पिरीटच.👆🏻✔
केवळ पावसाळ्यात,  वाईट गोष्टीत नाही तर उत्सवात एकत्र रहायचे मुंबई स्पिरीट. जणू नाण्याची दुसरी बाजू.

तेंव्हा उद्या ४ ही लाईन्स वरच्या ७०-८० स्टेशनवरील किमान प्रत्येकी २ फलाटावर सकाळी उभ्या राहिलेल्या चाकरमनींच्या तोंडी एकच गाणे असेल


येशील येशील येशील राणी 🚆
वेळेत लवकर येशील
अडचणी संपवून, वेगात पळून
खिडकीची जागा तू देशील? 🚆


📝अमोल केळकर
६/१०/१९
poetrymazi.blogspot.in

#लोकल माझी लाडाची लाडाची गं

Friday, October 4, 2019

वृक्ष वल्ली आम्हा नको रे


वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे 🌴🌴
पक्षीही रात्रीत घालविती .  !! १ !!
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे

येणे सुखे भासे 'मेट्रोचा प्रवास'
जाती सर्व शाप ' गाडी' येता  !! २ !!🚝
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे

विसरा लोकल चवथे आसन
भले तिथे ' कार शेड ' करी  !! ३ !!
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे

व्यथा न्यायदेवू असे उपचारा
पाहीतसे ' घावा' वाटसरू   !! ४ !!
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे

युतीकथा केवळ मनोरंजी विस्तार
करोनी 'प्रचार' ठेवू रुची  !! ५ !!
वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे

टुका(र) म्हणे होय मनासी संवाद
आपुलाचि वाद  आपणासि !! ६ !!

वृक्ष वल्ली आम्हा नको रे
आरे आरे 🌴🌴

 📝अमोल केळकर
०५/१०/१९
poetrymazi.blogspot.in

Wednesday, October 2, 2019

विधानसभा २०१९


' मंदी ' मधे ही *बेलापूरला*
उभी कमळीकडून " *मंदा* " 🌷
" *गणेश* " कृपेने होणार का
इतिहासाची पुनरावृत्ती यंदा ?

मुलाचेच तिकीट कापून
ऐरोलीत उभे  " *नाईक*"
*चंंपा* पडलेत विचारात
*कोथरुडलाच* व्हावे का स्थाईक  😝

📝२/१०/१९
poetrymazi.blogspot.in

# राजकीय सुगीचे दिवस
# विधानसभा निवडणूक २०१९
# बेलापूर विधानसभा

Tuesday, October 1, 2019

ए ताई, मला कोथरुडला येऊ दे


कोल्हापूरच्या दादांनी कोथरुडच्या ताईला केलेली विनंती

( मुळ गाणे: ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे)

ए ताई, मला कोथरुडला येऊ दे
एकदाच जिंकूनी मला विधानसभा पाहू दे

काका बघ कसे बडबड करिती
भाषणातून मला खुणविती
निवडणूक जिंकून मज
खुप खुप नाचू दे

ए ताई. ..

मतदारसंघ हा 'सेफ' वाटतो
"दादा" म्हणूनी साद घालतो
पुण्यामधुनी त्यांचा मजला
विssकास करु दे

ए ताई...

लाटेखाली उभा राहूनी
पुराचे मी अडवीन पाणी
मनसे , सेना, राष्ट्रवादी
वाट्टेल ते करु दे

ए ताई.... प्लिज 🙏🏻

मला कोथरुडला येऊ दे
एकदाच जिंकूनी मला विधानसभा पाहू दे

📝२/१०/१९
ललिता पंचमी 🌷
poetrymazi.blogspot.in
Related Posts Plugin for WordPress, Blogger...