झुकझुक झुकझुक अगीन गाडी 🚂
पळती झाडे पहात पहात मामाच्या गावाला जायची मजा आम्ही ब-याचदा बसनेच पुण्याला जाऊन घेतली असली तरी
'रेल्वे ' प्रवास हाच आमचा जन्मापासून आत्तापर्यंतचा सगळ्यात आवडता प्रवास आहे यात तिळमात्र शंका नाही.
आज १६ एप्रिल. भारतीय इतिहासात सगळ्यात पहिल्यांदा रेल्वे जी मुंबइईहून ( कुलाबा??) ठाण्यापर्यंत धावली ती आजच्याच दिवशी.
तर या आजच्या दिवसाच्या निमित्ताने आमची काॅलेज जीवनातील रेल्वे संबंधातील एक 'कटू' आठवण असं म्हणतात की वाईटातून चांगल घडतं तेंव्हा गोष्टीचा शेवट अर्थातच सुखद आहे.
तर केमिकल इंजिनियरींगच्या दुस-या किंवा तिस-या वर्षानंतर च्या सुट्टीतील घटना. माझा वारणानगरच्या काॅलेज चा मित्र माधव, कराड इंजिनियरींगला असणारा सांगलीचाच मित्र 'उपेंद्र' असा आमचा छोटा तिघांचाच ग्रुप होता. कराडला उपेंद्र बरोबर असणारा त्याचा मुंबईचा मित्र सांगलीला आलेला. आता सांगली जवळ बघण्यासारखी मोजकीच ठिकाणे. तर आम्ही ठरवलं की "औदुंबर" दाखवू त्याला.
ठरल्याप्रमाणे बसने औदुंबरला गेलो, दर्शन घेतले आणि परत सांगलीला निघताना एकदम लक्षात आले की आपण भिलवडी स्टेशनला जाऊन पुणे- मिरज ( का कोल्हापूर) पॅसेंजर पकडू शकतो. याचा फायदा असा होईल की या गाडीने आपण सरळ विश्रामबाग पर्यंत जाऊ शकू. त्यावेळी अर्थातच विश्रामबाग हाच आमचाही इतर सांगलीकर युवकांसारखा अड्डा होता हे वेगळे सांगणे नको आणी उपेंद्र चे घर तिथेच होते.
माझ्या सुचनेला अर्थातच इतर तिघांनी मंजुरी दिली. आम्ही गाडीच्या १०-१५ आधी स्टेशनवर आलो. गाडीची वाट बघू लागलो.
आता ब-याच जणांना हे माहित असेल की भिलवडी स्टेशनला मुख्य एकच प्लॅटफाॅर्म आहे. थांबणा-या सगळ्या गाड्यांना मेन लाईन सोडून प्लॅटफॉर्मच्या बाजूच्या साईड लूप वर यावे लागते आणि अर्थातच या सगळ्या प्रोसेस मधे गाडीचा वेग अतीशय मंदावतो
पुर्वी दक्षीण मध्य रेल्वे विभागात जिथे इलेक्ट्रिक सिग्नल नव्हते.प्रत्येक स्टेशनला येणारी गाडी आधीच्या स्टेशनहून सुटली की एकदा आणि या स्टेशनवर यायच्या थोडं आधी ( म्हणजे इंजीन दिसू लागल की) रेल्वे कर्मचारी घंटा वाजवायचे. त्याप्रमाणे भिलवडी स्टेशनवर पुण्याहून येणारी पॅसेंजर दिसायला लागताच घंटानाद झाला.
काय कुणास ठाऊक पण मी तिकडून गाडी दिसत असताना भिलवडी स्टेशनचा फलाट ओलांडून रुळा पलीकडे गेलो. इंजीनाने एव्हान मस्त मेन रुळ सोडून प्लॅटफॉर्मच्या दिशेचे सर्विस रुळ पकडले होते. इंजीनाचा कर्व्ह, मागचे डबे सगळं मस्त दिसत होते. इकडं मित्र मला बोलावतायत अमोल ये पटकन ये पटकन तरीही मी तिथेच उभा. आणि इंजीन फलाटावर येण्याच्या जरा आधी मी रुळ ओलांडून फलाटावर चढलो.
मी निवांत होतो कारण मी गाडी माझ्या उभारलेल्या ठिकाणी यायच्या खूप आधी रुळ ओलांडले होते आणि माझ्यामते मी कुठलीही मोठी रिस्क घेतली नव्हती, कारण समोरुन येणाऱ्या गाडीचा वेग मला कळत होता.
मात्र माझे हे सगळे विचार धुळीस मिळाले कारण तिथे उभ्या असणाऱ्या रेल्वेच्या एका आॅफीसरने माझ्या दंडाला पकडून एकदम मला धरले. मला अजूनही त्याचे आडनाव लक्षात आहे .' राव' आडनाव .म्हैसूर / धारवाड सेक्शनचा मोठा अधिकारी होता तो हे नंतर त्याच्याशी बोलताना कळले. पण त्या क्षणी तो आमच्या चौघांसाठी राव'ण' बनूनच आला होता
मला काहीच कळले नाही. पॅसेंजर एखादा मिनीटच स्टेशनवर थांबत असल्याने त्याने मला आणि तिघा मित्रांना लेडीज डब्यात चढवले. तिकीट विचारले, दाखवले
निदान आम्ही भूरटे नाही आहोत हे तरी त्याला समजले. पण नंतर तूम चारो अच्छे घर के दिखते हो असे म्हणत बापरे नंतर त्याने एवढं ऐकवल की बस बस बस.
तुम ऐसा कैसा किया?
ड्राइव्हर ब्रेक मारता तो?
कितनी जान जाती मालूम है? ठैरो तुम सबको अंदर डालता हूँ
( बिचारे माझ्याबरोबरचे तिघे 😉) अस म्हणतातच मात्र आमची भितीने....
सर साॅरी, परत ऐसा नही होगा, सर प्लीज प्लीज करत नांद्रे स्टेशन येईपर्यंत त्याला पटवण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः सांगतो खिशातील एकूण एक पैसे त्याला देऊन शेवटी मांडवली केली.
मंडळी याचा पुढचा उत्तरार्ध जास्त महत्वाचा ठरला. थोडी बोलणी सुरु झाली.बाय द वे या मांडवलीने आमची रवानगी नांद्रे स्टेशनहून पुढे जनरल डब्यात झाली होती. लेडीज डबा तरी सुटला होता.😁 त्यांनी नाव विचारले, काय करता, सगळे इंजिनियरींगला आहेत हे ऐकून हे भूरटे इंजिनियरींगला? असा भाव त्याच्या चेह-यावर अगदी दिसून येत होता. आम्ही त्यांना नाव वगैरे विचारले आणि काय मला हुक्की आली कुणास ठाऊक मी त्यांना म्हणलं सर एकबार इंजीन देखना है!. हे बोलणे होत असताना गाडी जस्ट माधवनगर स्टेशन ला शिरत होती.
मंडळी वाईटातून चांगले होते ते हे. पुढच्या काही क्षणात ते राव स्वतः आम्हाला चौघांना इंजीनात घेऊन आले. ड्राइव्हर वयस्कर होते. एक असिस्टंट ड्रायव्हर आणि रांवांना धरुन आम्ही ५ जण दाटीवाटीने उभे.
माधवनगर स्टेशन - ते सांगली स्टेशन
फारतर ७ एक मिनीटाचा प्रवास. इंजीन ड्राइव्हर काहीतरी माहिती देत होते पण मी स्वतः कुठल्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. सांगली स्टेशन आले, आम्ही उतरलो, रावांचे आभार मानले, मागच्या डब्यात चढलो कारण पुढच्या विश्रामबाग स्टेशनला उतरायचे होते, उतरलो पण नंतर कित्येक दिवस हा प्रवास कायम आमच्या स्मरणात राहिला
बरं का मंडळी, बेळगावहून मिरजे कडे येताना पु.लं नी इंजीनातून प्रवास केला होता, त्यांच्या नशिबाने त्यांना गाडीचा भोंगा वाजवण्याची संधीही मिळाली होती.
तशी हाॅर्न वाजवायची संधी मिळाली नसली तरी पु. लं प्रमाणे एका टुकार लेखकाने इंजिनातून प्रवास केला आहे हे ही नसे थोडे 😊
त्यानंतर आजतागायत कधीही रेल्वे रुळ ओलांडला नाही 🙏🏻👍🏻
'गाडी बुला रही है ' 🚂
📝अमोल केळकर
१६/०४/२०२०

No comments:
Post a Comment