'झूम लगा ले, झूम लगा ले, झूम '
खरंच ह्या लाॅकडाऊन च्या दिवसात आतापर्यत काय काय दिव्य पार पाडली आणि अजून काय काय बघायला लागणार आहे देव जाणे. 'वर्क फ्राॅम होम' म्हणजे लॅपटाॅप, संगणकावर काही कामे, २-४ फोन, फार तर व्हाटसप मेसेज इ पर्यत ठीक होतं पण हे 'झूम ( अॅप) लगाले' असा आदेश आला आणि घर नको पण आॅफीस बरं अस वाटायला लागलं.
स्वत: पुरते म्हणजे आॅफीस काम तरीपण समजू शकतो पण आता
' स्कूल फ्राॅम होम ' पण सुरु झाले आहे. या नवीन तंत्रज्ञानाने घेतलेली झेप पाहून खरच थक्क व्हायला झाले. नाही याची कल्पना आहे की सध्याच्या आलेल्या संकटावर मात करण्यासाठी ही शाळेने केलेली तात्पुरती उपाययोजना आहे आणि थोड्याकालावधी नंतर परत सर्व पुर्ववत होणार आहे.
पण क्षणभर विचार केला आपण शाळेत असताना 'झूम ' लगाले असतं तर? काय एकएक धमाल आली असतीना ? सगळ्यात मोठी गोची मास्तरांची झाली असती. प्रत्यक्ष शिकायला समोर मुले नाहीत. शांत बसा रे ! नाहीतर वर्गाबाहेर कोंबडा करायला लावेन ( इथ झूमवर म्यूट करुन घाला चिक्कार दंगा कुणाला कळतयं? पण एकटा घरी मी , सोबत कुणी नाही, दंगा तरी कुणाबरोबर करणार? ), किंवा लक्ष नसलेल्याला खडू मारुन भानावर आणणे, गणीत चुकल किंवा उत्तर आले नाही की पाठित बसणारा रट्टा? हे ठरलेल असताना, आता आमचे ' नाना ' सगळ्यांना उद्देशून , "उटिव त्याला, उटीव झोपलाय बघ झूमवर " असे म्हणताना बघवेल का सांगा की 😊
सकाळी ११:१५ च्या शाळेसाठी माधवनगर ते जयसिंगपूर ही १०:३०, १०:४० ची बस कारखान्यावर पकडून बसमधे माधवनगरहून आलेल्या मित्राजवळ जाऊन त्याला दप्तर धरायला देणे, तरुण भारत/मंडईच्या स्टाॅपला न उतरता बापटबाल जवळील स्पिडब्रेकरवर नेहमीच्या कंडक्टर कडून सिंगल बेलचा वशीला मारुन कसेबसे ११:१५ पर्यत कुपवाडकर सरांच्या काठीचा मार चुकवून वर्गात जाणे, जयस्तूsते -राष्ट्रगीत -प्रार्थना - हजेरी - ३५ मिनीटाचे ८ वेगवेगळे तास- १० मिनिटे आणि ४० मिनीटाच्या दोन सुट्या - एखाद्या आॅफ तासाला परत करायला मिळालेली अमरधाम वारी आणि - संध्याकाळी ५:१५ ला
'वंदे मातरम' होऊन घरी जाण्यासाठी शिवाजी मंडईच्या स्टाॅपकडे ठोकलेली 'धूम' ची मजा या 'झूम' मधे नक्कीच मिळणार नाही.
म्हणूनच 'नमस्कार माझा ज्ञानमंदिरा' किंवा प्रत्यक्ष ज्ञानमंदिराची पायरी चढल्यावरच कळते
'ही आवडते मज मनापासून ही शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा'
कल्पना आहे मला हे "झूम" काही दिवसांसाठी आहे आणि लवकरच हे सगळे शाळकरी परत धाळेत जाण्यासाठी 'धूम' ठोकतील कारण
धूम नशा है
धूम जुनून है
धूम है हलचल
धूम सुकून है
*मात्र*
आज तू सब कुछ भुला के "झूम"
झूम लगाले… *
झूम लगाले…
झूम
* टिप: झूम अॅप शाळेने दिलेल्या मार्गदर्शनानुसार आणि आपापल्या जबाबदारीवर उतरवून घ्यावे. काही मिसयूझ / नुकसानीस लेखक जबाबदार नाही
📝अमोल
१०/०४/२०२०
poetrymazi.blogspot.in
#झूम_लगाले_धूम_मचाले

No comments:
Post a Comment